Description
बायबलनुसार असलेला सेवेचा असलेला नमुना अनुसरू इच्छिणाऱ्या पाळकांना हे पुस्तक मोलाची मदत पुरवते. मुलभूत गोष्टींपासून सुरुवात करून सर्व आवश्यक गोष्टींची स्पष्ट माहिती देऊन पास्टर क्रेलॉफ यांनी उलगडात्मक संदेशासाठी एक सुरेख हस्तपुस्तिका उपलब्ध करून दिली आहे. हे प्रसिद्ध होत असल्याचे पाहून मला धन्य वाटते. जेथे अशी साधने सहज उपलब्ध होणे कठीण आहे आणि बायबलवर आधारित संदेशांविषयी लक्षणीय भूक आहे अशा भारतात हे प्रथम उपलब्ध होत आहे हे पाहून मला आनंद वाटतो.
माझी खात्री आहे की जर अधिकाधिक पाळकवर्ग २ तीम.४:२ चे मनापासून अनुकरण करतील तर आपण मंडळीची संख्येने वाढ झाल्याचे तर पाहूच पण (अधिक महत्त्वाचे म्हणजे) मंडळीचे आध्यात्मिक सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढलेले पाहू. माझी ही देखील खात्री आहे की, मंडळीच्या रोगावर उपाय करून तिला ख्रिस्ताकडे वळवण्यासाठी, तसेच भारत किंवा इतर कोणत्याही राष्ट्राला ख्रिस्ताकडे आणण्याचे एकच साधन आहे ते म्हणजे “बायबलनुसार संदेश.”
माझी प्रार्थना हीच आहे की जे हे काम वाचतील त्यांना पास्टर क्रेलॉफ ची तळमळ प्राप्त व्हावी आणि त्यांनी नव्या जोमाने २ तीम. ४:२ मधील श्रेष्ठ पाचारणासाठी स्वत:ला वाहून घ्यावे.
– जॉन मॅकआर्थर
Reviews
There are no reviews yet.