Posted on Leave a comment

14 April: त्याच्या प्रसिद्धीसाठी (गौरवासाठी) प्रार्थना करा


“ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र
मानले जावो.” (मत्तय 6:9).

पवित्र शास्त्र अनेकदा म्हणते की देव “त्याच्या नावासाठी” कार्य करतो.

 तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो. (स्तोत्र 23:3)
 हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर. (स्तोत्र 25:11)
 त्याने आपल्या नावासाठी त्यांचे तारण केले. (स्तोत्र 106:8)
 माझ्या नामाप्रीत्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकला. (यशया 48:9)
 कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झाली आहे. (1 योहान
2:12)

जर तुम्ही विचाराल की त्या सर्व वाक्यांत कोणती गोष्ट परमेश्वराचे अंतःकरण द्रवित करीत
आहेत (आणि अनेकांस ते आवडतात), तर उत्तर हे आहे की देव यांत प्रसन्न होतो की त्याचे
नाव कळविले जावे आणि त्याचा आदर केला जावा.

पहिली आणि सर्वात महत्त्वाची प्रार्थना जी करता येऊ शकते ती आहे, “तुझे नाव पवित्र
मानले जावो.” मला असे वाटत होते की ही एक प्रशंसा आहे. जसे, “हालेलुया! प्रभूचे नाव
पवित्र आहे!” पण ती प्रशंसा नाही. ती एक विनंती आहे. वास्तविक एक प्रकारचा आदेश
किंवा आज्ञा. प्रभु, असेंच होऊं दे! ते पवित्र मानिले जाऊं दे. तुझे नाव पवित्र मानले जावो.
ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे. मी यासाठी तुला आग्रह करीत आहे: लोकांना तुझे
नाव पवित्र मानावयास प्रवृत्त कर. मला तुझे नाव पवित्र मानावयास उत्तेजन दे!

जास्तीत जास्त लोकांनी त्याचे नाव “पवित्र” मानावे हे देवाला आवडते. म्हणूनच त्याचा पुत्र
ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांस त्यासाठी प्रार्थना करावयास शिकवतो. वस्तुतः, येशू हिला सर्वात

पहिली आणि सर्वश्रेष्ठ प्रार्थना ठरवतो. कारण हा पित्याचा प्रथम आणि सर्वांत मोठा आवेश
आहे.

“प्रभु, अधिकाधिक लोकांना तुझे नाव पवित्र मानण्याची प्रेरणा दे,” अर्थात, तुझ्या नावाचा
आदर, प्रशंसा, मान, विचार, सन्मान, श्रद्धा, आणि स्तुती होऊ दे. अधिकाधिक लोकांनी ते
करावें! म्हणून, आपण पाहू शकता की मुळांत ही एक सुवार्तिक प्रार्थना आहे.

Leave a Reply