”कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून
आपल्या सेवेकरता ठेवले; मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले,
म्हणून माझ्यावर दया झाली; आणि ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती ह्यांसह आपल्या
प्रभूची कृपा विपुल झाली. तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार
आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली
सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली“ (1 तीमथ्य 1:13-14,16).
पौलाचे परिवर्तन हे तुमच्यासाठी होते. तुम्ही ते ऐकले का? पुन्हा पहा: “जे युगानुयुगाच्या
जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू
ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून
माझ्यावर दया झाली.” ते आम्ही आहोत – म्हणजे, तुम्ही आणि मी.
मला आशा आहे की तुम्ही हे अगदी वैय्यक्तिकरित्या घ्याल. देवाने जेव्हा पौलाला निवडले
आणि ज्याप्रकारे त्याने आपल्या सार्वभौम कृपेद्वारे त्याला तारले तेव्हा हे सर्व त्याने तुम्हांला
लक्षात ठेऊन केलें.
जर तुम्ही सार्वकालिक जीवनासाठी येशूवर विश्वास ठेवता – अथवा जर तुम्ही सार्वकालिक
जीवनासाठी त्याच्यावर आजही विश्वास ठेऊ शकता – तर पौलाचे परिवर्तन तुमच्यासाठी
आहे. ज्याप्रकारे त्याचे परिवर्तन घडून आले त्याचा मुद्दा तुम्हाला ख्रिस्ताचे अविश्वसनीय धैर्य
हूबेहूब प्रगट करावे हा आहे.
लक्षात ठेवा की परिवर्तनापूर्वी पौलाचे जीवन येशूसाठी एक दीर्घकालीक परीक्षा होती.
“माझा छळ का करतोस?” दमिश्काच्या मार्गावर येशूने विचारले (प्रेषितांची कृत्ये 9:4).
“तुझे अविश्वासाचे आणि बंडखोरीचे जीवन हा माझा छळ आहे!” आणि तरीही पौल
आम्हाला गलतीकरांस 1:15 मध्ये सांगतो की देवाने त्याला त्याच्या मातेच्या उदरातून
जन्मल्यापासून त्याचा प्रेषित होण्यासाठी वेगळे केले. हे अद्भुत आहे. याचा अर्थ हा की
त्याच्या परिवर्तनाच्या क्षणापर्यंत त्याचे संपूर्ण जीवन देवाशी एक दीर्घकालीक गैरवर्तन होते,
येशूचा एक दीर्घकालीक अव्हेर आणि उपहास होता – ज्याने त्याला जन्मास येण्यापूर्वी प्रेषित
होण्यासाठी निवडले होते.
म्हणून पौल म्हणतो की त्याचे परिवर्तन येशूच्या धैर्याचे दैदित्यमान प्रदर्शन आहे. आणि तेच
तो आज आम्हास देतो.
येशूने पौलाला तारिले, व जेव्हा आणि ज्याप्रकारे त्याने ते केले, ते सर्व आम्हांला उदाहरण
ठरावे यासाठीच. आम्हास “आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून” (1 तीमथ्य 1:16).
अन्यथा आमचे धैर्य खचेल. अन्यथा आम्ही असा विचार करू की तो खरोखर आम्हास तारू
शकला नसता. कदाचित आम्ही विचार करू की तो रागावू शकतो. कदाचित आम्ही विचार
करू की आम्ही दूर निघून गेलो आहोत. कदाचित आम्ही विचार करू की आमच्या अतिप्रिय
जणांचे परिवर्तन होऊ शकत नाही – येशूच्या सार्वभौम, ओसंडून वाहणाऱ्या कृपेद्वारे –
अचानक, अनपेक्षितपणे.
Author: John Piper
24 April: क्षमेचे स्वतंत्र करणारे सामर्थ्य
“तुझ्या पापांची क्षमा झाली आहे” (लूक 7:4).
परुश्याच्या घरी एक स्त्री रडत येशूजवळ येते आणि त्याचे पाय धूते. यात शंका नाही की
जेव्हा शिमोनाने तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आपल्या डोळ्यांच्या खूणेने हे कळविले
की ही स्त्री पापी आहे आणि येशूने तिला त्यास स्पर्श करू देता कामा नये, तेव्हा तिला लाज
वाटली असेल.
खरोखर, ती पापी होती. लज्जित होणे स्वाभाविक होते. पण जात काळ नाही.
येशूने म्हटले, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे“ (लूक 7:48). आणि जेव्हा आमंत्रित लोक
याविषयी कुरकुर करू लागले, तेव्हा त्याने असे म्हणून तिच्या विश्वासास बळ दिले, “तुझ्या
विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा“ (लूक 7:50).
लज्जेच्या दुर्बळ प्रभावांशी लढा देण्यात येशूने तिची कशी मदत केली? त्याने तिला एक
अभिवचन दिले : “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे! तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. तुझे
भविष्य शांतीपूर्ण असेल.” त्याने घोषणा केली की मागील पापांची क्षमा आता भावी शांती
उत्पन्न करील.
म्हणून, तिच्यासाठी मुद्दा होता देवाच्या भावी कृपेत विश्वास, जो येशूच्या क्षमा करण्याच्या
कार्याच्या आणि स्वतंत्र करणाऱ्या शब्दाच्या अधिकारात मुळावलेला होता. आमच्यापैकी
प्रत्येकाने योग्य क्षमेच्या प्रभावांशी याचप्रकारे लढा दिला पाहिजे – खोटी लज्जा नाही, पण
अशी लज्जा ज्याची आम्हाला खरोखर जाणीव असली पाहिजे, पण अशी लज्जा जी फार
काळ टिकून राहण्याची आणि आम्हास निर्बळ करण्यास कारणीभूत ठरते.
आम्ही आम्हांला लज्जापूर्ण कृत्यांच्या प्राप्त झालेल्या क्षमेद्वारे येणाऱ्या भावी कृपा आणि
शांतीच्या अभिवचनांस धरून ठेऊन दुर्बळ करणाऱ्या लज्जेच्या अविश्वासाला लढा दिला
पाहिजे.
“तरीपण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे” (स्तोत्र 130:4)
“परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा
करा; दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि
परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो,
कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.” (यशया 55:6–7)
“जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून
आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.” (1
योहान 1:9)
“त्याच्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल
अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात..” (प्रेषित 10:43)
आम्हा सर्वांना पाप-क्षमेची गरज आहे. आणि आम्हाला त्याची उद्या गरज भासेल. येशू ते
आज आणि उद्या देण्यासाठी मरण पावला. आज असो वा उद्या, वास्तविकता ही आहेर :
देवाची क्षमा आम्हाला आमच्या भविष्यासाठी स्वतंत्र करते. ती आम्हाला दुर्बळ करणाऱ्या
लज्जेपासून मुक्त करते. क्षमा ही भावी कृपेने परिपूर्ण आहे.
जेव्हा आम्ही भावी कृपेत, जी देवाच्या क्षमेत मुळावलेली आहे, विश्वासाद्वारे जगतो, तेव्हा
आम्ही त्या लज्जेच्या जी अनुभवण्यास आम्ही पात्र आहोत, रेंगाळणाऱ्या, कमकूवत
करणाऱ्या प्रभावापासून मुक्त होतो. क्षमेचा हाच अर्थ आहे.
23 April: आपल्या नगराचे हितचिंतन करा
“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, ज्या सर्वांना मी यरुशलेमेहून बंदिवान होऊन
बाबेलास जायला लावले त्या सर्व बंदिवान झालेल्यांना मी असे म्हणतो: तुम्ही घरे बांधून
त्यांत वस्ती करा; मळे लावा व त्यांची फळे खा; तुम्हांला पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे
हितचिंतन करा व त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा; त्या नगराचे हित ते तुमचे हित”
(यिर्मया 29:4,5,7).)
जर बाबेल येथील देवाच्या बंदिवासातील लोकांसाठी ते खरे होते, तर या “बाबेलसारख्या”
जगातल्या ख्रिस्ती निर्वासितांसाठी ते आणखी खरे ठरेल. मग आपण काय करावें?
ज्या सामान्य गोष्टी करण्याची गरज आहे त्या केल्या पाहिजेत: घरे बांधणे; त्यात राहणे;
बाग लावणे. हे सर्व तुम्ही खऱ्या राजासाठी केलेत आणि फक्त माणसांना खूश करणाऱ्या
लोकांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे तर हे तुम्हाला दूषित करत नाही.
देवाने तुम्हाला ज्या ठिकाणी पाठवले आहे त्या ठिकाणाचे हितचिंतन करा. देवाने तुम्हाला
त्याच्या गौरवासाठी पाठवले आहे असे आपणाविषयी माना. कारण तुम्हाला त्याच्या
गौरवासाठीच पाठवले आहे.
तुमच्या शहराच्या वतीने देवाकडे प्रार्थना करा. शहरासाठी मोठ्या आणि उत्तम गोष्टी
घडाव्या म्हणून प्रार्थना करा. विनंती करा की ते देवाच्या सामर्थ्याने आणि त्याच्या
गौरवाप्रीत्यर्थ घडावे. शहराला भौतिक समृद्धीची गरज आहे त्यापेक्षा हजारपटीने जास्त
ज्या अंतिम चांगल्याची गरज आहे त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. ख्रिस्ती लोक सर्व
दुःखांची पर्वा करतात – विशेषतः शाश्वत दुःख. प्रत्येक शहराला भेडसावणारा या सर्वात
मोठ्या संकटास सामोरे जावें लागेल.
परंतु देव किंवा त्याचे लोक शहराचे आरोग्य, सुरक्षा आणि समृद्धी आणि स्वातंत्र्य यांबाबत
बेपर्वा नाहीत. आम्हा सर्वांना या गोष्टींची गरज आहे, आणि येशूनें म्हटले, “तू तुझ्या
शेजाऱ्यावर तुझ्यासारखी प्रीती कर” (मत्तय 22:39). खरे म्हणजे, प्रभु यिर्मयामध्ये म्हणतो
की तुमच्या शहरावर प्रीती करणे हा स्वतःवर प्रीती करण्याचा एक मार्ग आहे: “त्या नगराचे
हित ते तुमचे हित.”
याचा अर्थ असा नाही की आपण या जगांत प्रवासी म्हणून आपली दिशाभिमुखता सोडतो.
पेत्र म्हणतो की ख्रिस्ती लोक “प्रवासी आणि परदेशवासी” आहेत (1 पेत्र 2:11) आणि पौल
म्हणतो, “आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे” (फिलिप्पै 3:20). वस्तुतः, या जगाच्या
भुलविणाऱ्या आकर्षणांपासून स्थिरपणे दूर राहून आपण या जगाचे जास्तीत जास्त हित
करू. “जे नगर पुढे येणार आहे” (इब्री 13:14) त्यातून आपली मूल्ये प्राप्त करण्याद्वारे आम्ही
आपल्या शहराची उत्तमप्रकारे सेवा करू. “वर असलेल्या यरूशलेम” चे नागरिक होण्यासाठी
आम्ही आपल्या शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना बोलावून आम्ही आपल्या शहराचे
सर्वात हितचिंतन करू (गलती 4:26).
तर, चला जगूया – शक्य तितके हितचिंतन करूया (1 पेत्र 2:12) – की स्थानिकांना
आमच्या राजाला भेटावेसे वाटेल-
22 April: निर्भय होण्याची पाच कारणे
“हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे
वाटले आहे.“ (लूक 12:32)
पैशाबद्दल किंवा जगाच्या इतर गोष्टींबद्दल आपण भिती धरता कामा नये अशी देवाची
इच्छा आहे कारण ती निर्भयता – चिंतापासून मुक्ती – त्याच्याविषयी पाच महान गोष्टींत
आपली वाढ करील.
प्रथम, भयभीत न होणे हे दाखवते की आपण देवाला आपला मेंढपाळ म्हणून मूल्यवान
समझतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस.” आपण त्याचे कळप आहोत आणि तो आपला
मेंढपाळ आहे. आणि जर तो आपला मेंढपाळ आहे, तर स्तोत्र 23:1 लागू होते: “परमेश्वर
माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही” – म्हणजे, मला खरोखर ज्या गोष्टीची
गरज आहे त्यांची उणीव भासणार नाही.
दुसरे, न भिणे हे दाखवते की आम्ही देवाला आपला पिता म्हणून मूल्यवान समजतो.
“तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” आम्ही फक्त त्याचे लहान
कळप नाही; आम्ही त्याची मुले सुद्धा आहोत आणि तो आमचा पिता आहे. त्याला खरोखर
आमची काळजी आहे आणि आम्हाला काय हवे ते तो जाणतो आणि ज्याची तुम्हाला गरज
आहे ते तुमच्याजवळ आहे याची खात्री करण्यासाठी तो तुमच्यासाठी कार्य करेल.
तिसरे, चिंता न करणे हे दाखवते की आपण देवाला राजा म्हणून मूल्यवान समजतो. “हे
लहान कळपा, भिऊ नकोस, कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले
आहे.” तो आम्हाला “राज्य” देऊ शकतो कारण तो राजा आहे. जो आमची तरतूद करतो
त्यात हे सामर्थ्याचा एक प्रचंड घटक जोडते. “मेंढपाळ” संरक्षण आणि तरतूद दर्शवितो.
“पिता” प्रेम आणि सौम्यता आणि अधिकार आणि तरतूद आणि मार्गदर्शन. दर्शवितो. “राजा”
सत्ता आणि सार्वभौमत्व आणि संपत्तीचा सूचक आहे.
चौथे, न भिणे हे दर्शविते की देव किती मोकळ्या स्वभावाचा आणि उदार आहे. लक्ष द्या, तो
राज्य देतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस, कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या
पित्याला बरे वाटले आहे.” तो राज्य विकत नाही किंवा राज्य भाड्याने देत नाही किंवा
राज्य भाडेपट्टीवर देत नाही. तो अतिशय श्रीमंत आहे आणि त्याला आमच्याकडून मोबदला
देण्याची गरज नाही. तर, देव उदार आहे आणि विपुलतेतून मुक्तहस्ते देतो. आणि जेव्हा
आपण भीत नाही, तर आपल्या गरजांसाठी त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण
याविषयी त्याची वाखाणणी करतो.
शेवटी, न भिणे – काळजी न करणे – हे दर्शविते की देव ते खरोखर करू इच्छितो यावर
आपण विश्वास ठेवतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस, कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे
तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” त्यामुळे त्याला आनद होतो. तो जळफळत नाही.
आम्हाला राज्य देऊन तो आनंदित होतो. आमच्या सर्वांचेच पिता असे नव्हते, ज्यांना प्राप्त
करण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद वाटतो. पण ते दुःख आता मुख्य गोष्ट नाही, कारण आता
तुम्हाला असा पिता, मेंढपाळ आणि राजा मिळू शकतो.
म्हणून, या वचनाचा मुद्दा असा आहे की आपण देवाला आपला मेंढपाळ आणि पिता आणि
राजा म्हणून आपले धन समजले पाहिजे जो उदार होऊन आम्हास देवाचे राज्य देण्यात
आनंद मानतो – आम्हाला स्वर्ग देण्यासाठी, आम्हाला सार्वकालिक जीवन आणि आनंद
देण्यासाठी, आणि आम्हाला गरज असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी. तेथे जाण्यासाठी जर आपण
अशाप्रकारे देवाला आपले धन समजतो तर आपण निर्भय होऊ आणि देवाची उपासना केली
जाईल.
21 April: आमुलाग्र प्रीतीची किल्ली
”माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे
वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे
प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.“
(मत्तय 5:11,12)
मत्तय 5:44 मधून आपल्या शत्रूंवर प्रीती करण्याविषयी संदेश देत असतांना जे प्रश्न मी
विचारले त्यापैकी एक होता, तुमचे अपहरण करणाऱ्या आणि मग तुमचा खून करणाऱ्या
लोकांवर तुम्ही कशी प्रीती कराल?
हे आम्ही कसे करू शकतो? अशाप्रकारची प्रीती करण्याची सामर्थ्य कोठून येते? वास्तविक
जगात जेव्हा ते प्रगट होते तेव्हा हे किती आश्चर्यकारक असते याचा विचार करा! ख्रिस्ताचे
सत्य आणि सामर्थ्य आणि वास्तविकता प्रीतीपेक्षा इतर कुठल्या गोष्टीद्वारे दाखविली जाऊ
शकतांत का?
माझा विश्वास आहे की येशू आम्हाला ह्या आमुलाग्र, आत्म-बलिदानात्मक प्रीतीची किल्ली
देतो, जिचे वर्णन याच अध्यायात पूर्वी, मत्तय 5:44 मध्ये करण्यात आले आहे.
मत्तय 5:11 मध्ये, तो पुन्हा एकदा छळ होण्याविषयी बोलत आहे, जसा तो बोलत होता
जेव्हा त्याने मत्तय 5:44 मध्ये म्हटले, “तुम्ही आपल्या वैर्यांवर प्रीती करा, आणि जे तुमचा
छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करा.“ या वचनांविषयी
उल्लेखनीय हे आहे की येशू म्हणतो की तुम्ही केवळ शत्रूचे गैरवर्तन सहन करण्यास समर्थच
होऊ नका, तर तुम्ही त्यात आनंदहि करा. “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ
करतील… तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा व उल्लास करा.”
आनंद करनें आपल्या वैर्यांसाठी प्रार्थना करण्यापेक्षा किंवा त्यांचे कल्याण करण्यापेक्षा
आमच्या आटोक्याबाहेरचे वाटते. जर मी ही मानवीदृष्ट्या अशक्य गोष्ट करू शकलो –
म्हणजे, छळ होत असतांना आनंद करणे – तर माझा छळ करणाऱ्यांवर प्रीती करणे शक्य
होईल. जर अन्याय आणि यातना आणि हानीच्या दहशतीत आनंदाचा चमत्कार घडू शकला,
तर गुन्हेगारांप्रीत्यर्थ प्रीतीचा चमत्कारही घडू शकतो.
येशू या वचनांमध्ये आम्हाला आनंदाची गुरुकिल्ली देतो. तो म्हणतो, “आनंद करा, उल्लास
करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे” आनंदाची गुरुकिल्ली आहे देवाच्या भावी
कृपेवर विश्वास ठेवणे –म्हणजे, देव तुमच्यासाठी जे होण्याचे अभिवचन देतो त्यात
समाधानी असणे. तो म्हणतो, “आनंद करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे.”
छळवनूक होत असतांना आपला आनंद म्हणजे दहशतीच्या या क्षणी परत येण्याचा आणि
आम्हाला प्रीती करण्यासाठी स्वतंत्र करण्याचा स्वर्गाचा आनंद. म्हणून, हा आनंद म्हणजे
आपल्या शत्रूंवर प्रेम करण्याचे मुक्त सामर्थ्य आहे जेव्हा ते आपला छळ मांडतात.
जर ते खरे असेल, तर प्रीती करण्याची आज्ञा म्हणजे स्वर्गातील गोष्टींवर आपले मन
लावण्याची आज्ञा देखील आहे – देव आपल्यासाठी जे बनण्याचे अभिवचन देतो – पृथ्वीवरील
गोष्टींवर नाही (कलस्सै. 3:2).
आपल्या वैर्यांवर प्रेम करण्याची आज्ञा आमची आशा आणि आमच्या जीवाचे सखोल
समाधान आणि त्याचे सर्वात मोठे प्रतिफळ – त्याची भावी कृपा देवामध्ये शोधण्याची आज्ञा
आहे. आमूलाग्र प्रेमाची किल्ली भावी कृपेत विश्वास आहे. आमच्या वेदनेत आम्हास हे कळले
पाहिजे की देवाची प्रीती “जीवनाहून उत्तम” आहे (स्तोत्र 63:3). आपल्या वैर्यांवर प्रीती
केल्याने तुम्हाला स्वर्गात प्रतिफळ प्राप्त होत नाही. तर स्वर्गाचे प्रतिफळ जोपासल्याने
वैर्यांवर प्रीती करण्याचे सामर्थ्य तुम्हास प्राप्त होते.
20 April :भटकून दूर जाण्याची भिती
तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणाऱ्यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा
आश्रय करणाऱ्यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस. (स्तोत्र 31:19).
स्तोत्र 31:19 मधील दोन महत्त्वपूर्ण सत्यांवर विचार करा.
- देवाचा चांगुलपणा
देवाचे एक विशिष्ट चांगुलपण आहे. अर्थात, फक्त देवाचे ते सामान्य चांगुलपणच नव्हे जो तो
सर्व लोकांवर प्रगट करतो, तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो (मत्तय 5:45), तर
जसे स्तोत्र म्हणते, एक विशिष्ट चांगुलपण, “त्याचे भय धरणाऱ्यांसाठी”.
हे चांगुलपण अमर्याद प्रमाणात थोर आहे. ते विपुल आहे. ते कायम टिकून राहते. ते
सर्वसमावेशक आहे. जे त्याचे भय धरतात फक्त त्यांच्यासाठी हे चांगुलपण आहे. सर्व काही
त्यांच्या भल्याकरिता एकत्र मिळून कार्य करते (रोम 8:28) – रोम 5:3 आणि 5 नुसार त्यांच्या
वेदना देखील सर्व-कल्याणकारक आहेत.
पण जे त्याचे भय धरत नाहीत त्यांना तात्पुरता चांगुलपणा लाभतो. रोमकरांस 2: 4 आणि 5
याचे असे वर्णन करते: ”किंवा देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू
त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? की, आपल्या
हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या
प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?” ममता. क्षमा. सहनशीलता.
चांगुलपण. पण ते परमेश्वराचे भय धरतांत म्हणून नव्हे तर त्यांच्या हटवादीपणामुळें.
हे पहिले सत्य आहेः परमेश्वराचे चांगुलपण. - परमेश्वराचे भय
परमेश्वराचे भय म्हणजे त्याच्यापासून भटकून दूर जाण्याचे भय आहे. त्यामुळे, ते देवाचा आश्रय
घेण्यात व्यक्त होते. म्हणूनच स्तोत्र 31:19 मध्ये दोन अटींचा उल्लेख केलेला आहे – परमेश्वराचे
भय बाळगणे आणि त्याच्याठायी आश्रय घेणे. “तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय
धरणारयांकरता तू ते 1) साठवून ठेवले आहेस, 2) तुझा आश्रय करणणाऱ्यांसाठी
मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस.” ते विरुद्ध असल्यासारखे वाटतात. भय दूर सारत
असल्यासारखे वाटते आणि आश्रय घेणे जवळ ओढल्यासारखे वाटते. परंतु जेव्हा आपण पाहतो
की हे भय पळून जाण्याचे भय आहे – त्याजपासून दूर भटकून जाण्याचे भय आहे – तेव्हा ते
एकत्र काम करतात.
पवित्र जणांच्या अंतःकरणात खरा थरकाप असतो. ”भीत व कापत आपले तारण साधून घ्या.“
(फिलिप्पै 2:12). पण हा थरकाप त्या पित्याच्या बाहूंत वाटणारा थरकाप आहे ज्याने नुकतेच
आपल्या मुलाला समुद्राच्या पृष्ठभागाखालील प्रवाहातून बाहेर काढले आहे. आम्हाला पित्याची
गरज नाही हा विचार करण्याच्या भयंकर संभावनेचा हा थरकाप आहे.
म्हणून, देवाच्या चांगुलपणाची जोपासणूक करा. त्याच्यापासून भटकून दूर जाण्याच्या
विचाराने भयभीत व्हां. प्रत्येक पापापासून पळ काढा आणि त्याच्याठायी आश्रय घ्या. “तुझे
चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणाऱ्यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय
करणाऱ्यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस!”
19 April: विफल झालेल्यांचे भविष्य
“भिऊ नका, हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून
दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा; ज्या निरर्थक वस्तूंपासून तुम्हांला
काही लाभ किंवा तुमचा उद्धार होणे शक्य नाही त्यांच्यामागे लागू नका, कारण त्या केवळ
निरर्थक होत. परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, कारण
परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केले आहे.” (1 शमुवेल 12:20-22).
जेव्हा इस्राएली लोकांना त्यांनी शमुवेलाला इतर राष्ट्रांप्रमाणे राजा मिळावा म्हणून अशी
मागणी केल्याबद्दल भयभीत केले केलें आणि त्यांनी केलेल्या पापाबद्दल पश्चात्ताप करण्यास
सांगितले, तेव्हा ही चांगली बातमी येतेः “भिऊ नका; हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे.” ते किती
उलट वाटते हे तुम्ही ऐकता का – किती अद्भुतरित्या उलट? तुंम्हाला वाटेल त्यानें असे
म्हणावयाला पाहिजे होते, “भीती बाळगा, कारण हे दुष्कर्म तुम्ही केले आहे.” हे घाबरण्याचे
उत्तम कारण आहेः देवाशिवाय दुसरा राजा मागण्याचे मोठे दुष्कृत्य तुम्ही केले आहे! पण
शमूवेलाने तसे म्हटले नाही. “भिऊ नका; हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे.”
पुढे तो असे म्हणतो, “पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका, तर
मनोभावे परमेश्वराची सेवा करा; ज्या निरर्थक वस्तूंपासून तुम्हांला काही लाभ किंवा तुमचा
उद्धार होणे शक्य नाही त्यांच्यामागे लागू नका, कारण त्या केवळ निरर्थक होत.”
ही ती सुवार्ता आहे: तुम्हीं महा पाप केले खरे, आणि परमेश्वराचा भयंकर अनादर केला खरे,
जरी तुम्हाला आता एक राजा मिळाला आहे ज्याची मागणी करण्याचे दुष्कर्म तुम्ही केले होते,
जरी त्या पापास किंवा त्याचे दुःखदायक परिणाम जे अद्याप तुमच्यावर प्रगट झालें नाहींत,
परत बदलता येत नाही, तरीही एक भविष्य आणि आशा आहे. तुम्हांवर दया केलीं जाईल.
भिऊ नका! भिऊ नका!
मग 1 शमुवेल 12:22 मध्ये सुवार्तेचा मोठा आधार येतो – सुवार्तेचा आधार आणि पाया. हे सर्व
दुष्कर्म करूनही तुम्हाला भिण्याची गरज का नाही? “परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या
लोकांचा त्याग करणार नाही, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केले
आहे.”
सुवार्तेचा आधार आहे देवाची त्याच्या स्वतःच्या नामास्तव असलेली वचनबद्धता. तुम्हांला हे
कळलें का? तुम्ही पाप केले असले तरी भिऊ नका, “परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या
लोकांचा त्याग करणार नाही.” याचा तुमच्यावर दोनप्रकारे परिणाम घडून यायला पाहिजे :
अंतःकरण विदारून टाकणारी नम्रता आणि पायांनी नृत्य करावा इतका आनंद. नम्रता कारण
तुमच्या तारणाचा पाया तुमची योग्यता नाही. आनंद कारण तुमचे तारण हे देवाच्या स्वतःच्या
थोर नामास्तव असलेल्या निष्ठेइतकेच खात्रीलायक आहे. हि खात्री आमच्या कल्पनेपलीकडे
आहे.
18 April: देवा, आमच्या अंतःकरणांस स्फूर्ती दे
शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. ज्या सैनिकांच्या मनांस देवाकडून स्फूर्ती झाली ते
त्याच्याबरोबर गेले. (1 शमुवेल 10:26).
या वचनात काय म्हटले आहे यावर काहीं क्षण विचार करा. देवाने त्यांना स्फूर्ती दिलीं, किंवा
देवानें त्यांना स्पर्श केला. बायकोने नाही. मुलाने नाही. पालकाने नाही. सल्लाकाराने नाही.
तर देवाने. देवाने त्यांना स्फूर्ती दिलीं/स्पर्श केला.
त्यानें जो जो विश्वात अपरिमित सामर्थ्याचा धनी आहे. अनंत अधिकार आणि अनंत ज्ञान आणि
अमर्याद प्रेम आणि अमर्याद चांगुलपणा आणि अमर्याद पवित्रता आणि अपरिमित न्याय
असलेला. त्या देवानें त्यांच्या मनांस स्फूर्ती दिलीं.
बृहस्पतिचा परिघ रेणूच्या काठास कसा स्पर्श करतो? त्याच्या नाभीत प्रवेश करणे तर दूर
राहिले?
देवाचा स्पर्श किंवा त्याचे मनांस स्फूर्ती देणे अद्भुत आहे, केवळ यामुळे नाही की स्पर्श करणारा
वा स्फूर्ती देणारा देव आहे, तर यामुळे देखील की तो स्पर्श आहे. हा एक वास्तविक संबंध आहे.
त्या स्पर्शाचा संबंध आमच्या मनांशी असणें हे अद्भुत आहे. स्पर्शाचा संबंध देवाबरोंबर आहे हे
अद्भुत आहे. आणि तो वास्तविक स्पर्श आहे हे अद्भुत आहे.
शूर पुरुषांना उद्देशून फक्त बोलले जात नव्हते. त्यांच्यावर केवळ दैवी प्रभाव टाकीला जात
नव्हता. त्यांची केवळ भेंट घेऊन निवड केलीं गेलेली नव्हती. देवाने, आपल्या अमर्याद
कृपाळूतेने, त्यांच्या मनांस स्फूर्ती दिलीं. देव इतका जवळ होता. तरी ते भस्म झाले नाहीत.
मला तो स्पर्श आवडतो. मला तो आणखी हवा आहे. माझ्यासाठी आणि तुम्हा सर्वांसाठी. मी
प्रार्थना करतो की देवानें मला त्याच्या गौरवाने आणि या गौरवाप्रीत्यर्थ नव्याने स्पर्श करावा.
मी प्रार्थना करतो की त्याने आम्हा सर्वांच्या मनांस स्फूर्ती द्यावी.
ओहो, देवाचा तो स्पर्श मिळावा! जर तो स्पर्श अग्नीसह करण्यांत आला, तर तसेच व्हावे. जर
तो पाण्याने केला जात असेल तर असेच व्हावे. तो वाऱ्याने केला जात असेल तर तो तसाच
व्हावा. जर तो मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह होत असेल, तर आपण तो समर्पित
अंतकरणाने घेऊं.
हे परमेश्वरा, ये. इतक्या जवळ ये. भस्म कर आणि भिजव आणि वार कर आणि चुरगळा कर.
किंवा शांत आणि मंदपणे, ये. ये. आमच्या अंतःकरणास स्पर्श कर.
17 April: येशूला कवटाळणे
देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत
कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्याने जगावर जय
मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. (1 योहान 5:3-4).
लक्ष द्याः देवावर प्रीती करणे हे केवळ त्याच्या आज्ञांचे पालन करणे नव्हे. तर देवावर प्रीती
करणे देवासाठी एका विशिष्ट प्रकारचे अंतःकरण बाळगणे कीं जेणेकरून आज्ञा पाळणे कठीण
असणार नाही. योहान हेच म्हणतो. पण मग तो हे सत्य प्रीतीच्या संदर्भात न मांडता तो ते नवा
जन्म कठीण नाहीत: “जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर विजय मिळवते. म्हणून,
नवा जन्म म्हणजे देवाच्या आज्ञा त्याला बोजड वाटत नाही आणि आज्ञेचे पालन करतांना
जगीक अडचणींवर मात करतो.
आणि शेवटी तो पुढे म्हणतो, “आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास“
म्हणून, नवा जन्म भारमुक्त आज्ञापालनाप्रत येणाऱ्या सर्व जगीक अडचणींवर मात करतो,
कारण नवा जन्म विश्वासात वाढ करतो. म्हणून, नव्या जन्माचा चमत्कार विश्वास उत्पन्न
करतो, अत्यंत संतोषकारक म्हणून ख्रिस्तामध्ये आपल्यासाठी देव जो काही आहे ते स्वीकारतो,
जे जगाच्या परीक्षांपेक्षा देवाप्रत आज्ञाधारकतेस अधिक इच्छिण्यायोग्य बनवते. आणि देवावर
प्रीती करण्याचा हाच अर्थ आहे.
अठराव्या शतकातील पाळक आणि पवित्र शास्त्राचे विद्वान जोनाथन एडवर्ड्स यांनी या
वचनाशी संघर्ष केला आणि असा निष्कर्ष काढला, “तारणदायक विश्वास . . . प्रेम अभिव्यक्त
करतो. . . देवावरील आमचे प्रेम आम्हाला देवाच्या आज्ञा पाळण्यात येणाऱ्या अडचणींवर मात
करण्याचे सामर्थ्य देते – जे दर्शविते की तारणदायक विश्वासात, त्याचे जीवन आणि सामर्थ्य
यात प्रेम ही मुख्य गोष्ट आहे, ज्याद्वारे ते मोठे परिणाम घडवून आणतात.”
माझ्या मते एडवर्डचे बरोबर आहे आणि बायबलमधील असंख्य वचने तो जे काही म्हणतो त्याचे
समर्थन करतात.
असे म्हणण्याची आणखी एक पद्धत ही की ख्रिस्तावरील विश्वास देव आमच्यासाठी काय आहे
याची केवळ सहमती देणेच नाही तर तो ख्रिस्तामध्ये आमच्यासाठी जो काही आहे त्या सर्वांचा
स्वीकार करणे देखील आहे. “खरा विश्वास ख्रिस्ताचा त्याप्रकारे स्वीकार करतो ज्या प्रकारे
पवित्र शास्त्र दरिद्री पापी लोकांप्रत त्यास सादर करतो” – हे एडवर्ड्सचे दुसरे उद्धरण आहे. हे
“कवटाळणे” ख्रिस्तावरील एक प्रकारचे प्रेम आहे – असे प्रेम जे त्याला इतर सर्व गोष्टींपेक्षा
अधिक मूल्यवान समजते.
म्हणून, एकीकडे 1 योहान 5:3, जे म्हणते देवासाठी आमची प्रीती आम्हाला त्याच्या आज्ञांचे
पालन करण्यास समर्थ बनविते, आणि दुसरीकडे, 4थे वचन जे म्हणते की आमचा विश्वास
देवाच्या आज्ञांचे पालन करण्यापासून आम्हास रोखणाऱ्या अडखळणांवर मात करतो, यांत
विरोधाभास नाहींच. देव आणि ख्रिस्त ह्यांच्यावर प्रीती विश्वासात गर्भित आहे.
मग योहान आज्ञा पाळणाऱ्या विश्वासाची अशा प्रकारे व्याख्या करतो “येशू देवाचा पुत्र आहे
असा विश्वास जो धरतो” (1 योहान 5:5). हा विश्वास वर्तमान येशूला गौरवी दैवी व्यक्ती जो
तो आहे असे म्हणून “स्वीकार करतो.” हे फक्त या सत्यास सहमति देणे नव्हे की येशू हा देवाचा
पुत्र आहे, कारण दुरात्मेसुद्धा हे मान्य करतात. “तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे येशू,
देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला पिडण्यास येथे आला
आहेस काय?” (मत्तय 8:29). येशू हा देवाचा पुत्र आहे हा विश्वास करण्याचा अर्थ त्या सत्याचे
महत्व – वास्तविकतेचे मूल्य “स्वीकार करणे” होय. याचा अर्थ देवाचा पुत्र म्हणून ख्रिस्तासोबत
आणि त्याच्याठायी देव आमच्यासाठी जे काही आहे त्यात संतुष्ट होणे होय.
“देवाचा पुत्र” म्हणजे येशू हा त्याच्या पित्याच्या उजवीकडे असलेला विश्वातील सर्वात श्रेष्ठ
व्यक्ती आहे. म्हणून, त्याने जे काही शिकवले ते खरे आहे, आणि त्याने जे काही अभिवचन दिले
ते स्थिर राहील आणि आत्म्यास संतुष्ट करणारी त्याची सर्व महानता कधीही बदलणार नाही.
म्हणून, तो देवाचा पुत्र आहे हा विश्वास धरणे, या सर्वांवर अवलंबून राहणे, आणि त्यात संतुष्ट
होणे होय.
16th April: आजच्यासाठी करुणा
आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही.ती
रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे. (विलापगीत 3:22-23).
परमेश्वराची करुणा रोज सकाळी नवी होते कारण दररोज त्या दिवसासाठी पुरेशी करुणा
मुबलक प्रमाणांत उपलब्ध असते. देव प्रत्येक दिवसाचे दुःख ठरवितो. तसेंच देव प्रत्येक
दिवसासाठी करुणा देखील ठरवितो. त्याच्या मुलांच्या जीवनात, दु:ख व करुणा परिपूर्णपणे
ठरविण्यात आलेलें आहेंत. येशूने म्हटले, ”ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची
चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.“ (मत्तय 6:34). ज्या दिवसाचे दुःख त्या
दिवसाला पुरे. प्रत्येक दिवशी त्याची दया किंवा करुणा ठरविली आहे. प्रत्येक दिवस दर सकाळी
नवा होतो.
परंतु जेव्हा आपल्याला वाटते की आजच्या साधनसामुग्रीवर उद्याचा भार आपल्याला सहन
करावा लागू शकतो तेव्हा आपण कित्येकदा निराश होतो. देवाला वाटते की आपण हे जाणावे
की असे होणार नाही. आजची करुणा आजच्या दुःखांसाठी आहे. उद्याची करुणा ही उद्याच्या
दुःखांसाठी असणार आहे.
कधीकधी आपण विचार करतो की भयंकर परीक्षेत स्थिर उभे राहण्यासाठी आम्हांवर करुणा
केलीं जाईल कीं नाहीं. होय, केलीं जाईल. पेत्र म्हणतो, ”ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत
असल्यास तुम्ही धन्य आहात; कारण गौरवाचा आत्मा म्हणजे ‘देवाचा आत्मा’ तुमच्यावर येऊन
‘राहिला आहे.’ त्यांच्याकडून त्याची निंदा होते, पण तुमच्याकडून तो गौरविला जातो“ (1 पेत्र
4:14). जेव्हा निंदा होते, तेव्हा गौरवाचा आत्मा येतो. स्तेफनाला दगडमार होत असतांना असे घडले.
तुमच्यासाठी देखील असेंच घडेल. जेव्हा आत्म्याची आणि गौरवाची गरज भासेल, तेव्हा
ते येतील.
रानात मान्ना एका दिवसाला एकदाच दिला जात असे. साठवणूक करायची नव्हती. देवाच्या
दयेवर आपण अशाच प्रकारे अवलंबून राहिले पाहिजे. उद्याची ओझी उचलण्याचे बळ तुम्हाला
आज प्राप्त होणार नाही. आजच्या दुःखांसाठी तुम्हाला करुणा देण्यात आली आहे.
उद्या करुणा नवी होईल. ”ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला
बोलावले तो देव विश्वसनीय आहे.“ (1 करिंथ 1:9).