Paul Washer

The Gospel of Jesus Christ (मराठी)

Paperback

40.00

986 in stock

Description

पॉल वॉशर वाचकांना येशूबद्दलच्या सुवर्तेच्या पवित्रशास्त्राधारीत आढाव्याद्वारे आपल्या सोबत चालवत आहेत. पवित्रशास्त्रातील एका मागून एक उतारा सादर करताना, वॉशर देवाचे पवित्र चरित्र, मानवाची पापमाय स्तिथी आणि पश्‍चात्ताप करणाऱ्या आणि विश्‍वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी येशूचे जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थानामध्ये सापडलेल्या दैवी समाधानाचे वर्णन केले आहे. जर तुम्हाला सुवार्तेचे मूलभूत दावे जाणून घेण्याची आवड असेल किंवा कोणी ख्रिस्ताच्या सत्यांचा शोध घेत असेल, तर जगाने ऐकलेल्या सर्वात मोठ्या वार्तेच्या ह्या संक्षिप्त वर्णनाची तुम्हाला गरज आहे.

अनुमोदन 

सुवार्तेपेक्षा सुंदर काहीही नाही, सुवार्ता हीच की, देव येशू ख्रिस्ताद्वारे पापी लोकांचे तारण करतो. खोट्या सुवार्तेपेक्षा अधिक निंदनीय काहीही नाही. देवाचे वचन सतत लक्षात ठेवून , पॉल वॉशर आपल्याला सत्य जाणून घेण्यासाठी क्रमबद्ध पद्धतीने देव कोण आहे, आपण कोण आहोत आणि आपण देवासोबत आत्ता आणि अनंतकाळ कसे राहू शकतो याबद्दल मार्गदर्शन करतात. ही पुस्तिका पाप्यासाठी औषध आणि संतांसाठी अन्न आहे.

डॉ. जोएल आर. बीक, अध्यक्ष प्यूरिटन रिफॉर्म्ड थियोलॉजिकल सेमिनरी, ग्रँड रॅपिड्स, मिशिगन.