Description
What to look for in a Pastor!
पाळकाचा शोध घेणाऱ्या समितीसाठी मार्गदर्शक पुस्तक
मंडळीच्या जीवनामध्ये योग्य पाळक शोधणे हा निर्णायक समय असतो. परंतु बहुतेक मंडळ्या यासाठी अननुभवी व अजाण पुलपिट समितीवर अवलंबून राहतात. बहुतेक वेळा असे करणे आपल्या उमेदवारांच्या निवडीबाबत जुगार खेळल्यासारखे ठरते कारण त्यांना पाळक निवडीबाबत बायबलचे असलेले निकष ठाऊक नसतात.
मग मंडळीने आपल्या पुलपिटसाठी योग्य मनुष्य कसा शोधावा? ह्या पुस्तकाची मांडणी करताना पाळक शोध समितीला मदत करण्यासाठी सहा मुलभूत प्रश्नांवर चर्चा केली आहे : तो प्रभावीपणे शिकवू शकतो का? तो पात्र आहे का? त्याचे ईश्वरी सिद्धांताचे ज्ञान योग्य आहे का? त्याचे आचरण त्याच्या सिद्धांताशी जुळणारे आहे का? आणि मंडळीने असा माणूस कसा शोधावा? ज्यांना उपदेश आणि मेषपालत्वाच्या इतर जबाबदाऱ्या यांमध्ये समतोल साधायचा आहे अशा शोध समित्या, मंडळीचे पुढारी, पाळक आणि पाळकाची भूमिका काय हे जाणू इच्छिणाऱ्या सर्वांनाच ब्रायन बीडबाक यांच्या स्पष्ट लिखाणाद्वारे मदत होईल.
Reviews
There are no reviews yet.