Description
ख्रिस्ती जीवनाची सुरुवात जशी साधनांशिवाय होत नाही, तसेच त्याची वाढही त्यांच्याशिवाय होऊ शकत नाही.
ख्रिस्ती जीवन कठीण असू शकते, विशेषतः देवाच्या मार्गांशी शत्रुत्व असणाऱ्या जगात. परंतु चांगली बातमी अशी आहे की, देव आपल्या पवित्र वचनाच्या प्रचाराद्वारे त्याच्या लोकांना उपयुक्त साधने पुरवितो. त्याने अशी साधने नेमून दिली आहेत, ज्यायोगे आपण देवाच्या स्वरूपात वाढू शकतो.
‘देवभक्त जीवनाकरिता पवित्र मदत’ (Holy Helps for a Godly Life) या पुस्तकमालेमध्ये रिचर्ड रॉजर्स यांनी देवभक्त जीवनासाठी आवश्यक असलेल्या साधनांचे वर्णन केले आहे. ते या साधनांचे स्वरूप स्पष्ट करतात, त्यांचा योग्य उपयोग कसा करावा हे शिकवतात आणि त्यांचा जीवनात कसा अवलंब करावा याचे मार्गदर्शन करतात.
जे लोक या साधनांचा योग्य आणि आदरपूर्वक उपयोग करतात, त्यांना देव कृपा करण्याचे वचन देतो. आणि जे लोक विश्वासाने या साधनांचा उपयोग करतात, त्यांना स्वतःच्या जीवनात त्यांच्या खऱ्या मूल्याचा अनुभव येतो.
_________________________________________________________________________________
“या पुस्तकातील सल्ला ख्रिस्ती तरुण आणि वृद्ध दोघांनाही उपयुक्त आहे—मग ते विश्वासात नवीन असोत किंवा आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ असोत. पवित्र शास्त्र स्पष्टपणे शिकवण्याची रिचर्ड रॉजर्स यांना प्राप्त झालेली देणगीच नव्हे, तर दैनंदिन ख्रिस्ती जीवनासाठी व्यावहारिक मार्गदर्शन करण्याची त्यांची पाळकीय काळजीही यातून दिसून येते. देवभक्त जीवनाकरिता पवित्र मदत (Holy Helps for a Godly Life) हे पुस्तक १६०३ मध्ये प्रथम प्रकाशित झाले तेव्हा जितके मूल्यवान होते, तितकेच ते आजही आहे. आता आर. एच. बी. आणि ब्रायन हेजेस यांच्या विशेष परिश्रमांमुळे रिचर्ड रॉजर्स यांच्याविषयी असे म्हणता येईल की, ‘ते मेले असूनही आजही बोलत आहेत’ (इब्री लोकांस पत्र ११:४).”
— डोनाल्ड एस. व्हिटनी
प्राध्यापक, पवित्र शास्त्र आणि आध्यात्मिकता
सदर्न बॅप्टिस्ट थिऑलॉजिकल सेमिनरी, लुईव्हिल
लेखक, Spiritual Disciplines for the Christian Life









Reviews
There are no reviews yet.