Description
जॉन पायपर लिहितात, “मी तुम्हाला एक शोकांतिका काय असते ते सांगणार आहे. तुमचे आयुष्य कसे वाया घालवायचे ते मी तुम्हाला दाखविणार आहे. फेब्रुवारी 1998 च्या रीडर्स डायजेस्टमध्ये प्रकाशित ह्या गोष्टीवर विचार करा: एका जोडप्याने पाच वर्षांपूर्वी ईशान्येतील त्यांच्या नोकरीतून लवकर निवृत्ती घेतली. त्या वेळी तो 59 वर्षांचा होता आणि ती 51 वर्षांची होती. आता ते फ्लोरिडा येथील पुंता गोर्डा येथे राहतात, आणि तिथे ते त्यांच्या 30 फुट लांबीच्या बोटीत समुद्राची सैर करतात, सॉफ्टबॉल खेळतात आणि शंख गोळा करतात….’ न्यायाच्या महान दिवशी ते ख्रिस्तासमोर उभे असल्याची कल्पना करा: “पहा, प्रभू माझे हे शंख पहा.’ ही एक शोकांतिका आहे.
“देवाने आपल्याला एकच तीव्र इच्छा बाळगून जीवन जगण्यासाठी निर्माण केले आहे: आपण आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आनंदाने देवाची सर्वोच्च श्रेष्ठता प्रदर्शित करावी यासाठीच. वाया घालविलेलें जीवन हे कसलीही तीव्र इच्छा नसलेले जीवन आहे. देव आपल्याला प्रार्थना करण्यासाठी आणि विचार करण्यासाठी आणि स्वप्ने पाहण्यासाठी तसेच योजना आखून त्यानुसार कार्य
करण्यास पाचारण करतो, केवळ स्वतःच्या जीवनाला महत्व देण्यासाठी नव्हे, तर आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूने त्याला (देवाला) महत्व देण्यासाठी पाचारण करतो.”
“बहुतेक लोक देवाविषयी तळमळ न बाळगता ध्येयविरहित जीवन जगतात, नको त्या क्षुल्लक गोष्टींमध्ये आपले जीवन वाया घालवतात, ऐशोआराम आणि वासनापूर्ती मिळवण्यासाठी जगतात आणि शक्य होईल तितके पापापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. हे पुस्तक तुम्हाला शून्यवत जीवनात अडकून न पडण्याविषयी सावध राहण्याचा इशारा देईल. ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा अभिमान बाळगून शेवटपर्यंत जीवन जगण्याविषयी तुम्हाला आव्हान देईल आणि जर तुमचा असा विश्वास असेल की जगणे हे ख्रिस्त आणि मरण हा लाभ आहे, तर हे पुस्तक जरूर वाचा, ख्रिस्तासाठी जगायला शिका. आणि हो, तुमचे आयुष्य वाया घालवू नका!”
जॉन पायपर हे शिक्षक आणि desiringGod.org चे संस्थापक आणि बेथलेहेम कॉलेज आणि सेमिनरीचे कुलपती आहेत. त्यांनी मिनियापोलिसमधील बेथलेहेम बॅप्टिस्ट चर्चचे पाळक म्हणून 33 वर्षे सेवा केली आणि ते 50 पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात व्हेन आय डोन्ट डिझायर गॉड, धिस मोमेंटरी मॅरेज, डझ गॉड डिझायर ऑल टू बी सेव्हड्?, आणि ब्लडलाईन्स ह्या पुस्तकांचा समावेश आहे.
Reviews
There are no reviews yet.