Description
4,00,000 हून अधिक प्रतींच्या विक्रीचा उच्चांक गाठलेले एक अत्यंत लोकप्रिय आणि अभिजात पुस्तक!
अनुभवी पाळक आर. केंट ह्युजेस यांचे भक्तिमान पुरुषाचे शिस्तप्रिय जीवन हे सर्वाधिक विक्री होणारे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. नवीन संदर्भ आणि सुचविलेल्या संसाधनांसह हे पुस्तक आता अद्ययावत करण्यात आले आहे. पुरुषांना प्रार्थना, सचोटी, वैवाहिक जीवन, पुढारीपण, उपासना, पवित्रता आणि अशा अनेक गोष्टींमध्ये वाढण्यासाठी हे पुस्तक ईश्वरी मार्गदर्शनाने ओतप्रोत भरलेले आहे.
“ह्युजेस यांनी या उत्कृष्ट खांडाद्वारे एक मोठी पोकळी भरून काढली आहे. जर तुमच्या आत्म्यात आध्यात्मिक इच्छेची थोडी जरी ठिणगी असेल, तर हे पुस्तक तिचे रूपांतर नक्कीच आध्यात्मिक शिस्तीच्या धगधगत्या आवडीमध्ये करेल.”
जॉन मॅकआर्थर, पाळक, ग्रेस कम्युनिटी चर्च, सन व्हॅली, कॅलिफोर्निया; अध्यक्ष, द मास्टर्स युनिव्हर्सिटी अँड सेमिनरी
“‘देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी धडपड करा’ या पवित्र शास्त्रातील हाकेला कोणीतरी इतक्या गांभीर्याने घेत आहे, हे पाहणे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आणि मनाला उभारी देणारे आहे.”
जॉन पायपर, संस्थापक आणि शिक्षक, डिझायरिंगगॉड.ऑर्ग; प्रमुख, बेथलहेम कॉलेज अँड सेमिनरी; लेखक, डिझायरिंग गॉड
“हा एक अद्भूत खंड आहे! हे पुस्तक तुम्ही आत्मसात करा, म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व आध्यात्मिक औदासिन्यपणा आणि मरगळ नाहीशी होईल.”
चार्ल्स स्विंडॉल, पाळक; लोकप्रिय लेखक
आर. केंट ह्युजेस (D.Min., ट्रिनिटी इव्हँजेलिकल डिव्हिनिटी स्कूल) हे व्हिटन, इलिनॉय येथील कॉलेज मंडळीचे निवृत्त वरिष्ठ पाळक आहेत. तसेच, उत्तर अमेरिकेसह जगभरात शास्त्रनिष्ठ प्रवचनाच्या सभा आयोजित करणाऱ्या चार्ल्स सिमियन ट्रस्ट, या संस्थेचे ते संस्थापक आहेत. प्रीचिंग द वर्ड या टीकाग्रंथ मालिकेचे संपादक म्हणून ते काम पाहतात आणि ते अनेक पुस्तकांचे लेखक व सह-लेखक आहेत.









Reviews
There are no reviews yet.