Books for spiritual life (मराठी)

Paperback

105.00

92 in stock

Category:

Description

बायबल: देवाचे अचूक वचन

लेखक: जेम्स नायस्मिथ 

बायबलवर आपण विश्वास ठेऊ शकतो काय? त्यात जे काही लिहिलेले आहे त्यावर आपण विश्वास ठेऊ शकतो काय? त्यात काही चुका नि परस्परविरोधी विधाने आहेत काय?

लेखकाचा पूर्ण विश्वास आहे की बायबल हे अचूक आणि विश्वसनीय आहे. अचूक याचा अर्थ चुकांपासून मुक्त आणि विश्वसनीय याचा अर्थ फसवणुकीपासून मुक्त असा होय. जेव्हा आपण म्हणतो बायबल अचूक आहे तेव्हा त्याचा अर्थ हाच होतो की ते सर्वार्थाने सत्य आणि चूक नसलेले आहे. जेव्हा ते विश्वसनीय म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा की त्याच्यावर आपण पूर्ण भरवसा, विश्वास टाकू शकतो; ते विश्वासघातकी नाही. (३४ पाने)

वासनेची समस्या

लेखक: विल्यम मॅकडॉनल्ड

कोणत्याही समस्येला तोंड देताना नेमकी समस्या काय आहे हे ओळखून घेणे उचित ठरते. विल्यम मॅकडॉनल्ड यांनी अनेक वर्षे पुष्कळ तरुण लोकांना सल्ला दिला आणि शास्त्र लेखांतून उत्तरे देऊन त्यांना मदत केली. ह्या पुस्तिकेत लेखकाने समस्येचे मूळ कारण दाखवून ती समजण्यास मदत केली आहे. ती कशी टाळावी आणि अपयशाच्या परिस्थितीत काय करावे हे सांगितले आहे. किशोरवयीन मुलांनाही खास मार्गदर्शन केले आहे. ही पुस्तिका किशोरवयीन मुलांना व तरुणांना तर उपयोगी पडेलच पण पालकांनाही आपल्या मुलांना मार्गदर्शन करण्यास तिची मदत होईल. (२२ पाने)

एकदा तारलात की कायमचे बदललात

लेखक: स्टीव्ह फर्नांडिस (1948-2013)
अनुवाद: क्रॉसी उर्टेकर

नव्याने जन्म होणे याचा अर्थ काय?

आजच्या आपल्या पिढीमध्ये पुनर्जीवन याच्या अर्थाबाबत बराच गैरसमज आहे. हा गैरसमज सुवार्तावादी मंडळ्यांतही मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. अशा समजाने बायबलमध्ये असलेला पुनर्जीवनाचा अर्थ इतका कमकुवत व निरस केला गेला आहे की कायमस्वरूपी बदल न होता व भक्कम आध्यात्मिक पुरावा नसतानाही लोकांना “नवीन जन्म पावलेले ख्रिस्ती” असे समजण्यात येते. याच्या परिणामाने देवाच्या मूलभूत नवीकरणाच्या कार्याची किंमत कमी केली जाते.
आपल्या स्पष्ट व संक्षिप्त अभ्यासात नवीन जन्म म्हणजे काय याचा आवश्यक गुणधर्म समजून घेण्यास पास्टर स्टीव्ह फर्नांडिस यांनी मदत केली आहे. यामध्ये व्यक्तीच्या गाभ्याचा कल आणि स्वभाव संपूर्ण बदलला जातो. त्यामुळे व्यक्तीचे तिच्या वृत्तीमध्ये व आचरणात मूलभूत रूपांतर होते- एकदा तारलात की कायमचे बदललात! (५३ पाने)