त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या
देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.
तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने
आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, कृपेने तुमचे
तारण झालेले आहे (इफिस 2:3-5).
गब्रीएल स्वर्गदूताने तुम्हाला असे म्हणतांना आवडणार नाही का की, “तू परमप्रिय आहेस?”
दानीएलासोबत हे तीनदा घडले.
- “तुझ्या प्रार्थनांना आरंभ होताच आज्ञा झाली, ती तुला सांगण्यास मी आलो आहे; कारण तू परमप्रिय आहेस.” (दानीएल 9:23)
- “हे दानिएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे; नीट उभा राहा; कारण मला आता तुझ्याकडे पाठवले आहे;” (दानीएल 10:11)
- तो म्हणाला, “परमप्रिय मानवा, भिऊ नकोस; तुला शांती असो, हिंमत धर, नेट धर.” (दानीएल 10:19)
मी हे कबूल करतो की दरवर्षी जेव्हा मी बायबल वाचतो आणि ही वचने पाहतो, तेव्हा मी ती
घेऊन स्वतःस लागू करू इच्छितो. मला देवाला हे म्हणतांना ऐकावेसे वाटते की, “तू परमप्रिय
आहेस.”
खरे म्हणजे, मी हे ऐकतो. आणि तुम्ही देखील ते ऐकू शकता. जर तुमच्याठायी येशूवर विश्वास
असेल, तर देव स्वतः त्याच्या वचनात तुम्हाला म्हणतो – जे देवाचा दूत म्हणतो त्यापेक्षा अधिक
निश्चित आहे – “तू परमप्रिय आहेस.”
इफिस 2:3-5,8 मध्ये असे लिहिलेले आहे : आम्ही ”इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव
दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील
स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, …कारण कृपेनेच
विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे.”
हेच एकमेव ठिकाण आहे जेथे पौल “अपरंपार प्रेम” या अद्भुत वाक्यांशाचा उपयोग करतो.
आणि ते देवदूताच्या वाणीपेक्षा उत्तम आहे. जर तुम्ही येशूकडे सत्य म्हणून पाहिले आहे आणि
त्याला तुमचा श्रेष्ठ खजिना म्हणून स्वीकारले आहे, अर्थात जर तुम्ही ”जिवंत” असाल, तर तुम्ही
परमप्रिय आहात. विश्वाच्या निर्माणकर्त्याने तुम्हांवर अपरंपार प्रीती केलीं. याचा विचार करा!
परमप्रिय बंधुजन!