Posted on Leave a comment

25 April: पौलाचे तारण तुमच्यासाठी होते

”कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून
आपल्या सेवेकरता ठेवले; मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले,
म्हणून माझ्यावर दया झाली; आणि ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती ह्यांसह आपल्या
प्रभूची कृपा विपुल झाली. तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार
आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली
सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली“ (1 तीमथ्य 1:13-14,16).


पौलाचे परिवर्तन हे तुमच्यासाठी होते. तुम्ही ते ऐकले का? पुन्हा पहा: “जे युगानुयुगाच्या
जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू
ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून
माझ्यावर दया झाली.” ते आम्ही आहोत – म्हणजे, तुम्ही आणि मी.

मला आशा आहे की तुम्ही हे अगदी वैय्यक्तिकरित्या घ्याल. देवाने जेव्हा पौलाला निवडले
आणि ज्याप्रकारे त्याने आपल्या सार्वभौम कृपेद्वारे त्याला तारले तेव्हा हे सर्व त्याने तुम्हांला
लक्षात ठेऊन केलें.

जर तुम्ही सार्वकालिक जीवनासाठी येशूवर विश्वास ठेवता – अथवा जर तुम्ही सार्वकालिक
जीवनासाठी त्याच्यावर आजही विश्वास ठेऊ शकता – तर पौलाचे परिवर्तन तुमच्यासाठी
आहे. ज्याप्रकारे त्याचे परिवर्तन घडून आले त्याचा मुद्दा तुम्हाला ख्रिस्ताचे अविश्वसनीय धैर्य
हूबेहूब प्रगट करावे हा आहे.

लक्षात ठेवा की परिवर्तनापूर्वी पौलाचे जीवन येशूसाठी एक दीर्घकालीक परीक्षा होती.
“माझा छळ का करतोस?” दमिश्काच्या मार्गावर येशूने विचारले (प्रेषितांची कृत्ये 9:4).
“तुझे अविश्वासाचे आणि बंडखोरीचे जीवन हा माझा छळ आहे!” आणि तरीही पौल
आम्हाला गलतीकरांस 1:15 मध्ये सांगतो की देवाने त्याला त्याच्या मातेच्या उदरातून
जन्मल्यापासून त्याचा प्रेषित होण्यासाठी वेगळे केले. हे अद्भुत आहे. याचा अर्थ हा की
त्याच्या परिवर्तनाच्या क्षणापर्यंत त्याचे संपूर्ण जीवन देवाशी एक दीर्घकालीक गैरवर्तन होते,
येशूचा एक दीर्घकालीक अव्हेर आणि उपहास होता – ज्याने त्याला जन्मास येण्यापूर्वी प्रेषित
होण्यासाठी निवडले होते.

म्हणून पौल म्हणतो की त्याचे परिवर्तन येशूच्या धैर्याचे दैदित्यमान प्रदर्शन आहे. आणि तेच
तो आज आम्हास देतो.

येशूने पौलाला तारिले, व जेव्हा आणि ज्याप्रकारे त्याने ते केले, ते सर्व आम्हांला उदाहरण
ठरावे यासाठीच. आम्हास “आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून” (1 तीमथ्य 1:16).
अन्यथा आमचे धैर्य खचेल. अन्यथा आम्ही असा विचार करू की तो खरोखर आम्हास तारू
शकला नसता. कदाचित आम्ही विचार करू की तो रागावू शकतो. कदाचित आम्ही विचार
करू की आम्ही दूर निघून गेलो आहोत. कदाचित आम्ही विचार करू की आमच्या अतिप्रिय
जणांचे परिवर्तन होऊ शकत नाही – येशूच्या सार्वभौम, ओसंडून वाहणाऱ्या कृपेद्वारे –
अचानक, अनपेक्षितपणे.

Leave a Reply