“हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे
वाटले आहे.“ (लूक 12:32)
पैशाबद्दल किंवा जगाच्या इतर गोष्टींबद्दल आपण भिती धरता कामा नये अशी देवाची
इच्छा आहे कारण ती निर्भयता – चिंतापासून मुक्ती – त्याच्याविषयी पाच महान गोष्टींत
आपली वाढ करील.
प्रथम, भयभीत न होणे हे दाखवते की आपण देवाला आपला मेंढपाळ म्हणून मूल्यवान
समझतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस.” आपण त्याचे कळप आहोत आणि तो आपला
मेंढपाळ आहे. आणि जर तो आपला मेंढपाळ आहे, तर स्तोत्र 23:1 लागू होते: “परमेश्वर
माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही” – म्हणजे, मला खरोखर ज्या गोष्टीची
गरज आहे त्यांची उणीव भासणार नाही.
दुसरे, न भिणे हे दाखवते की आम्ही देवाला आपला पिता म्हणून मूल्यवान समजतो.
“तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” आम्ही फक्त त्याचे लहान
कळप नाही; आम्ही त्याची मुले सुद्धा आहोत आणि तो आमचा पिता आहे. त्याला खरोखर
आमची काळजी आहे आणि आम्हाला काय हवे ते तो जाणतो आणि ज्याची तुम्हाला गरज
आहे ते तुमच्याजवळ आहे याची खात्री करण्यासाठी तो तुमच्यासाठी कार्य करेल.
तिसरे, चिंता न करणे हे दाखवते की आपण देवाला राजा म्हणून मूल्यवान समजतो. “हे
लहान कळपा, भिऊ नकोस, कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले
आहे.” तो आम्हाला “राज्य” देऊ शकतो कारण तो राजा आहे. जो आमची तरतूद करतो
त्यात हे सामर्थ्याचा एक प्रचंड घटक जोडते. “मेंढपाळ” संरक्षण आणि तरतूद दर्शवितो.
“पिता” प्रेम आणि सौम्यता आणि अधिकार आणि तरतूद आणि मार्गदर्शन. दर्शवितो. “राजा”
सत्ता आणि सार्वभौमत्व आणि संपत्तीचा सूचक आहे.
चौथे, न भिणे हे दर्शविते की देव किती मोकळ्या स्वभावाचा आणि उदार आहे. लक्ष द्या, तो
राज्य देतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस, कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या
पित्याला बरे वाटले आहे.” तो राज्य विकत नाही किंवा राज्य भाड्याने देत नाही किंवा
राज्य भाडेपट्टीवर देत नाही. तो अतिशय श्रीमंत आहे आणि त्याला आमच्याकडून मोबदला
देण्याची गरज नाही. तर, देव उदार आहे आणि विपुलतेतून मुक्तहस्ते देतो. आणि जेव्हा
आपण भीत नाही, तर आपल्या गरजांसाठी त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण
याविषयी त्याची वाखाणणी करतो.
शेवटी, न भिणे – काळजी न करणे – हे दर्शविते की देव ते खरोखर करू इच्छितो यावर
आपण विश्वास ठेवतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस, कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे
तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” त्यामुळे त्याला आनद होतो. तो जळफळत नाही.
आम्हाला राज्य देऊन तो आनंदित होतो. आमच्या सर्वांचेच पिता असे नव्हते, ज्यांना प्राप्त
करण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद वाटतो. पण ते दुःख आता मुख्य गोष्ट नाही, कारण आता
तुम्हाला असा पिता, मेंढपाळ आणि राजा मिळू शकतो.
म्हणून, या वचनाचा मुद्दा असा आहे की आपण देवाला आपला मेंढपाळ आणि पिता आणि
राजा म्हणून आपले धन समजले पाहिजे जो उदार होऊन आम्हास देवाचे राज्य देण्यात
आनंद मानतो – आम्हाला स्वर्ग देण्यासाठी, आम्हाला सार्वकालिक जीवन आणि आनंद
देण्यासाठी, आणि आम्हाला गरज असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी. तेथे जाण्यासाठी जर आपण
अशाप्रकारे देवाला आपले धन समजतो तर आपण निर्भय होऊ आणि देवाची उपासना केली
जाईल.