Posted on Leave a comment

20 April :भटकून दूर जाण्याची भिती

तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणाऱ्यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा
आश्रय करणाऱ्यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस. (स्तोत्र 31:19).
स्तोत्र 31:19 मधील दोन महत्त्वपूर्ण सत्यांवर विचार करा.

  1. देवाचा चांगुलपणा
    देवाचे एक विशिष्ट चांगुलपण आहे. अर्थात, फक्त देवाचे ते सामान्य चांगुलपणच नव्हे जो तो
    सर्व लोकांवर प्रगट करतो, तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो (मत्तय 5:45), तर
    जसे स्तोत्र म्हणते, एक विशिष्ट चांगुलपण, “त्याचे भय धरणाऱ्यांसाठी”.

    हे चांगुलपण अमर्याद प्रमाणात थोर आहे. ते विपुल आहे. ते कायम टिकून राहते. ते
    सर्वसमावेशक आहे. जे त्याचे भय धरतात फक्त त्यांच्यासाठी हे चांगुलपण आहे. सर्व काही
    त्यांच्या भल्याकरिता एकत्र मिळून कार्य करते (रोम 8:28) – रोम 5:3 आणि 5 नुसार त्यांच्या
    वेदना देखील सर्व-कल्याणकारक आहेत.

    पण जे त्याचे भय धरत नाहीत त्यांना तात्पुरता चांगुलपणा लाभतो. रोमकरांस 2: 4 आणि 5
    याचे असे वर्णन करते: ”किंवा देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू
    त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? की, आपल्या
    हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या
    प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?” ममता. क्षमा. सहनशीलता.
    चांगुलपण. पण ते परमेश्वराचे भय धरतांत म्हणून नव्हे तर त्यांच्या हटवादीपणामुळें.
    हे पहिले सत्य आहेः परमेश्वराचे चांगुलपण.
  2. परमेश्वराचे भय
    परमेश्वराचे भय म्हणजे त्याच्यापासून भटकून दूर जाण्याचे भय आहे. त्यामुळे, ते देवाचा आश्रय
    घेण्यात व्यक्त होते. म्हणूनच स्तोत्र 31:19 मध्ये दोन अटींचा उल्लेख केलेला आहे – परमेश्वराचे
    भय बाळगणे आणि त्याच्याठायी आश्रय घेणे. “तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय
    धरणारयांकरता तू ते 1) साठवून ठेवले आहेस, 2) तुझा आश्रय करणणाऱ्यांसाठी

मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस.” ते विरुद्ध असल्यासारखे वाटतात. भय दूर सारत
असल्यासारखे वाटते आणि आश्रय घेणे जवळ ओढल्यासारखे वाटते. परंतु जेव्हा आपण पाहतो
की हे भय पळून जाण्याचे भय आहे – त्याजपासून दूर भटकून जाण्याचे भय आहे – तेव्हा ते
एकत्र काम करतात.

पवित्र जणांच्या अंतःकरणात खरा थरकाप असतो. ”भीत व कापत आपले तारण साधून घ्या.“
(फिलिप्पै 2:12). पण हा थरकाप त्या पित्याच्या बाहूंत वाटणारा थरकाप आहे ज्याने नुकतेच
आपल्या मुलाला समुद्राच्या पृष्ठभागाखालील प्रवाहातून बाहेर काढले आहे. आम्हाला पित्याची
गरज नाही हा विचार करण्याच्या भयंकर संभावनेचा हा थरकाप आहे.

म्हणून, देवाच्या चांगुलपणाची जोपासणूक करा. त्याच्यापासून भटकून दूर जाण्याच्या
विचाराने भयभीत व्हां. प्रत्येक पापापासून पळ काढा आणि त्याच्याठायी आश्रय घ्या. “तुझे
चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणाऱ्यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय
करणाऱ्यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस!”

Leave a Reply