Posted on Leave a comment

19 April: विफल झालेल्यांचे भविष्य

“भिऊ नका, हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून
दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा; ज्या निरर्थक वस्तूंपासून तुम्हांला
काही लाभ किंवा तुमचा उद्धार होणे शक्य नाही त्यांच्यामागे लागू नका, कारण त्या केवळ
निरर्थक होत. परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, कारण
परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केले आहे.” (1 शमुवेल 12:20-22).

जेव्हा इस्राएली लोकांना त्यांनी शमुवेलाला इतर राष्ट्रांप्रमाणे राजा मिळावा म्हणून अशी
मागणी केल्याबद्दल भयभीत केले केलें आणि त्यांनी केलेल्या पापाबद्दल पश्चात्ताप करण्यास
सांगितले, तेव्हा ही चांगली बातमी येतेः “भिऊ नका; हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे.” ते किती
उलट वाटते हे तुम्ही ऐकता का – किती अद्भुतरित्या उलट? तुंम्हाला वाटेल त्यानें असे
म्हणावयाला पाहिजे होते, “भीती बाळगा, कारण हे दुष्कर्म तुम्ही केले आहे.” हे घाबरण्याचे
उत्तम कारण आहेः देवाशिवाय दुसरा राजा मागण्याचे मोठे दुष्कृत्य तुम्ही केले आहे! पण
शमूवेलाने तसे म्हटले नाही. “भिऊ नका; हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे.”

पुढे तो असे म्हणतो, “पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका, तर
मनोभावे परमेश्वराची सेवा करा; ज्या निरर्थक वस्तूंपासून तुम्हांला काही लाभ किंवा तुमचा
उद्धार होणे शक्य नाही त्यांच्यामागे लागू नका, कारण त्या केवळ निरर्थक होत.”

ही ती सुवार्ता आहे: तुम्हीं महा पाप केले खरे, आणि परमेश्वराचा भयंकर अनादर केला खरे,
जरी तुम्हाला आता एक राजा मिळाला आहे ज्याची मागणी करण्याचे दुष्कर्म तुम्ही केले होते,
जरी त्या पापास किंवा त्याचे दुःखदायक परिणाम जे अद्याप तुमच्यावर प्रगट झालें नाहींत,
परत बदलता येत नाही, तरीही एक भविष्य आणि आशा आहे. तुम्हांवर दया केलीं जाईल.
भिऊ नका! भिऊ नका!

मग 1 शमुवेल 12:22 मध्ये सुवार्तेचा मोठा आधार येतो – सुवार्तेचा आधार आणि पाया. हे सर्व
दुष्कर्म करूनही तुम्हाला भिण्याची गरज का नाही? “परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या
लोकांचा त्याग करणार नाही, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केले
आहे.”

सुवार्तेचा आधार आहे देवाची त्याच्या स्वतःच्या नामास्तव असलेली वचनबद्धता. तुम्हांला हे
कळलें का? तुम्ही पाप केले असले तरी भिऊ नका, “परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या
लोकांचा त्याग करणार नाही.” याचा तुमच्यावर दोनप्रकारे परिणाम घडून यायला पाहिजे :
अंतःकरण विदारून टाकणारी नम्रता आणि पायांनी नृत्य करावा इतका आनंद. नम्रता कारण
तुमच्या तारणाचा पाया तुमची योग्यता नाही. आनंद कारण तुमचे तारण हे देवाच्या स्वतःच्या
थोर नामास्तव असलेल्या निष्ठेइतकेच खात्रीलायक आहे. हि खात्री आमच्या कल्पनेपलीकडे
आहे.

Leave a Reply