Posted on Leave a comment

11April :थोर राजाचा द्राक्षरस

“कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख
याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.”
(इब्री 4:15).

मी कोणालाही कधीही असे म्हणतांना ऐकलेले नाही, ”माझ्या जीवनाचे खरोखर गंभीर धडे
सुख आणि विश्रांतीच्या समयातून आले आहेत.“ तर मी सुदृढ पवित्र जणांस असे म्हणतांना
ऐकले आहे, ”देवाच्या प्रीतीच्या खोलीचे आकलन करून घेण्यासाठी आणि त्याजबरोबर
खोलवर वाढत जाण्यासाठी मी केलेली प्रत्येक महत्त्वाची वाटचाल दुःखातून आली आहे.”

हे एक गंभीर बायबलसंबंधीत सत्य आहे. उदाहरणार्थ:”इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा
प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी असे समजतो; त्याच्यामुळे
मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा
लाभ प्राप्त व्हावा.” (फिलिप्पै 3:8). अर्थ: वेदना नाही, तर लाभ नाही.

किंवा: आता मला जर त्याद्वारे ख्रिस्ताचा अधिक लाभ होत असेल, तर मग सर्व गोष्टींचा
त्याग केला पाहिजे.

येथे आणखी एक उदाहरण आहे: अर्थ: ”तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो
आज्ञाधारकपणा शिकला;” (इब्री 5:8). याच पुस्तकात असे म्हटलेले आहे की त्याने कधी पाप
केले नाही (इब्री 4:15).

म्हणून आज्ञाधारकपणा शिकण्याचा अर्थ हा नाही की अवज्ञेकडून आज्ञाधारकपणाकडे येतो.
याचा अर्थ आज्ञाधारकपणाच्या अनुभवात देवासोबत अधिक खोलवर वाढत जाणे. याचा
अर्थ देवाप्रत समर्पणाचा अनुभव करणे जो अन्यथा प्राप्त झाला नसता. दुःखातून हेच प्राप्त
होते. वेदना नाही, तर लाभ नाही.

सॅम्युएल रदरफोर्डने म्हटले की जेव्हा त्यांना दुःखाच्या कालकोठीत टाकण्यात आले तेव्हा
त्यांना आठवले की थोर राजा नेहमी तेथे त्याचा द्राक्षरस ठेवत असे. चार्ल्स स्पर्जन यांनी
म्हटले, “दुःखाच्या समुद्रात डुबकी मारणारे दुर्लभ मोती आणतात.”

जेव्हा तुम्हाला काही अनोख्या वेदना होतात ज्यामुळे तुम्हाला असे वाटते की कर्करोग झाला
आहे तेव्हा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीवर अधिक प्रीती करीत नाही का? आम्ही खरोखर
विचित्र प्राणी आहोत. जर आपल्याजवळ आरोग्य आणि शांती आणि प्रेम करण्यास वेळ
असेल तर ती एक पातळ आणि घाईघाईची गोष्ट ठरू शकते. परंतु जर आपण मरणाच्या
लागास असू, तर प्रेम ही एक अव्यक्त आनंदाची खोल, संथ नदी बनते, आणि आपण क्वचितच
तिचा त्याग करणे सहन करू शकतो.

म्हणून, माझ्या बंधूं आणि भगिनींनो, “नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते
तेव्हा तुम्ही आनंदच माना.” (याकोब 1:2).

Leave a Reply