Posted on Leave a comment

15 April: खेचरासारखे होऊ नका.

“निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका; त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी
सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ येणार नाहीत.” (स्तोत्र 32:9).

असे कल्पनाचित्र रंगवा की देवाचे लोक सर्व प्रकारच्या प्राण्यांचे खळे आहे. देव त्याच्या
प्राण्यांची काळजी घेतो, त्यांना कोठे जायचे आहे ते दाखवतो, आणि त्यांच्या जीवनासाठी
धान्याचे कोठार बांधतो.

परंतु प्राण्यांच्या ह्या खळ्यांत एक जनावर आहे जे देवाला भयंकर त्रास देते, ते म्हणजे
खेचर. ते मूर्ख आहे आणि ते हट्टी आहे आणि यांपैकी कोणता अवगुण प्रथम आहे हे तुम्ही
ओळखू शकत नाही – हट्टीपणा की मूर्खपणा.

आता देव ज्या प्रकारे त्याच्या प्राण्यांना अन्न देण्यासाठी आणि त्यांना निवारा देण्यासाठी
कोठारात नेतो ते हे शिकवून की त्यांना सर्वांना एक वैयक्तिक नाव आहे आणि नंतर त्यांना
नावाने हाक मारणे. ”मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण
तुला देईन” (स्तोत्र 32:9).

पण खेचर त्या प्रकारच्या बोधाला किंवा मार्गदर्शनाला प्रतिसाद देणार नाही. त्याला समज
नाही. म्हणून देव त्याच्या पिक-अप ट्रकमध्ये बसतो आणि शेतात जातो, खेचराच्या तोंडात
ओठाळी आणि लगाम घालतो, त्याला ट्रकला जुंपतो आणि त्याला ओडत खळ्यात नेतो जेथे
तो ताठ पायांनी आणि फुरफुरत जातो.

देवाची अशी पद्धत नाही की त्याच्या प्राण्यांनी त्याच्याकडे आशीर्वाद आणि संरक्षणासाठी
अशाप्रकारे यावे.

पण एक दिवस असा येईल जेव्हां त्या खेचराला खूप उशीर झालेला असेल. त्याच्यावर
गारांचा वार होणार आहे आणि विजेचा कडकडाट होणार आहे, आणि जेव्हा तो धावत येईल
तेव्हा खळ्याचे दार बंद झालेलें असेल.

म्हणून, खेचरांसारखे होऊ नका. “निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका; त्यांना
आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ येणार
नाहीत.”

त्याऐवजी, देव पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने त्याला प्रार्थना करावी (स्तोत्र
32:6).

खेचरासारखे न होणें म्हणजे स्वतःला नम्र करणे, प्रार्थनेत देवाकडे येणे, आपली पापे कबुल
करणे आणि शेतातील गरजू लहान पिल्लांप्रमाणे त्याच्या संरक्षणाच्या आणि तरतूदीच्या
खळ्यात जाण्यासाठी देवाचे मार्गदर्शन स्वीकारणे.

Posted on Leave a comment

14 April: त्याच्या प्रसिद्धीसाठी (गौरवासाठी) प्रार्थना करा


“ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र
मानले जावो.” (मत्तय 6:9).

पवित्र शास्त्र अनेकदा म्हणते की देव “त्याच्या नावासाठी” कार्य करतो.

 तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो. (स्तोत्र 23:3)
 हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर. (स्तोत्र 25:11)
 त्याने आपल्या नावासाठी त्यांचे तारण केले. (स्तोत्र 106:8)
 माझ्या नामाप्रीत्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकला. (यशया 48:9)
 कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झाली आहे. (1 योहान
2:12)

जर तुम्ही विचाराल की त्या सर्व वाक्यांत कोणती गोष्ट परमेश्वराचे अंतःकरण द्रवित करीत
आहेत (आणि अनेकांस ते आवडतात), तर उत्तर हे आहे की देव यांत प्रसन्न होतो की त्याचे
नाव कळविले जावे आणि त्याचा आदर केला जावा.

पहिली आणि सर्वात महत्त्वाची प्रार्थना जी करता येऊ शकते ती आहे, “तुझे नाव पवित्र
मानले जावो.” मला असे वाटत होते की ही एक प्रशंसा आहे. जसे, “हालेलुया! प्रभूचे नाव
पवित्र आहे!” पण ती प्रशंसा नाही. ती एक विनंती आहे. वास्तविक एक प्रकारचा आदेश
किंवा आज्ञा. प्रभु, असेंच होऊं दे! ते पवित्र मानिले जाऊं दे. तुझे नाव पवित्र मानले जावो.
ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे. मी यासाठी तुला आग्रह करीत आहे: लोकांना तुझे
नाव पवित्र मानावयास प्रवृत्त कर. मला तुझे नाव पवित्र मानावयास उत्तेजन दे!

जास्तीत जास्त लोकांनी त्याचे नाव “पवित्र” मानावे हे देवाला आवडते. म्हणूनच त्याचा पुत्र
ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांस त्यासाठी प्रार्थना करावयास शिकवतो. वस्तुतः, येशू हिला सर्वात

पहिली आणि सर्वश्रेष्ठ प्रार्थना ठरवतो. कारण हा पित्याचा प्रथम आणि सर्वांत मोठा आवेश
आहे.

“प्रभु, अधिकाधिक लोकांना तुझे नाव पवित्र मानण्याची प्रेरणा दे,” अर्थात, तुझ्या नावाचा
आदर, प्रशंसा, मान, विचार, सन्मान, श्रद्धा, आणि स्तुती होऊ दे. अधिकाधिक लोकांनी ते
करावें! म्हणून, आपण पाहू शकता की मुळांत ही एक सुवार्तिक प्रार्थना आहे.

Posted on Leave a comment

13 April: तुमच्या अश्रूंना बोला

“जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत
बाहेर पडतो तो खातरीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.” (स्तोत्र 126:5-6).
बी पेरण्याविषयी दुःखद काहीही नाही. त्यासाठी कापणीपेक्षा जास्त श्रम लागत नाही.
दिवस सुंदर असू शकतात. कापणीसाठी मोठी आशा असू शकते.

तरीही स्तोत्र “अश्रूपूर्ण नेत्रांनी” पेरणी करण्याविषयी सांगते. ते म्हणते की कोणीतरी
“पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो.” तर, ते का रडत आहेत?

मला वाटते की त्याचे कारण हे नाही की पेरणी करणे दुःखाचे आहे किंवा पेरणी कठीण आहे.
मला असे वाटते की रडण्याचा संबंध पेरणीशी मुळीच नाही. पेरणी हे फक्त काम आहे जे
आपल्याला तेव्हांही केले पाहिजे जेव्हां आमच्या जीवनात रडवणाऱ्या गोष्टी असतांत.

आमचे दुःख करणे समाप्त होईपर्यंत किंवा आमच्या सर्व समस्यांचे निवारण केलें जाईपर्यंत
पिके थांबणार नाहीत. जर आम्हाला पुढच्या हिवाळ्यात खायचे असेल, तर आम्हाला शेतात
जावे लागेल आणि बी पेरावे लागेल, आम्ही रडत असू वा नसू.

जर तुम्ही असे करता, तर स्तोत्राचे अभिवचन हे आहे की तुम्ही “हर्षाने कापणी कराल.”
तुम्ही “आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन” घरी याल. यासाठी नाही की पेरणीच्या
आसवांमुळे कापणीचा आनंद उत्पन्न होतो, तर निव्वळ पेरणीमुळे कापणी होते, आणि जरी
तुमचे अश्रू तुम्हाला पेरणी सोडून देण्यास मोहात पाडत असले, तरीही तुम्हाला हे लक्षात
ठेवण्याची गरज आहे.
तर, धडा हा आहेः जेव्हा साधी, सरळ कामे करावयाची असतात, आणि तुमचे अंतःकरण
दुःखाने भरलेले असेल, आणि तुमची आसवे सहज वाहत असतील, तेव्हा पुढे जा आणि
अश्रूंसोबतच कामे करा. वास्तववादी बना. आपल्या अश्रूंना म्हणा, “अश्रूंनो, मला तुमची
जाणीव आहे. तुम्ही माझ्यात जीवनाचा त्याग करण्याची इच्छा उत्पन्न करता. पण शेतात
पेरणी करावयाची आहे (भांडी धुवायची, गाडी दुरूस्त करावयाची, उपदेश लिहावयाचा
आहे).”

मग, देवाच्या वचनाच्या आधारे म्हणा, “अश्रूंनो, मला माहित आहे की तुम्ही सदाकाळ
टिकणार नाही. मी माझे काम (अश्रू आणि सर्व) करतो फक्त ही वस्तुस्थिती शेवटी
आशीर्वादाची कापणी आणील. म्हणून, पुढे जा आणि जरूरी असेल तर वाहत रहा. पण
माझा विश्वास आहे – जरी मला ते अद्याप दिसत नसले किंवा ते पूर्णपणे जाणवत नसले –
तरी माझा विश्वास आहे की माझ्या पेरणीचे साधे काम कापणीच्या पेढ्या घेऊन येईल.
आणि माझे अश्रू आनंदात बदलतील.”

Posted on Leave a comment

12 April: शेवटी तुम्ही पराभूत होऊ शकत नाही


“तुमच्याजवळ पहारा आहे; जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा.” (मत्तय 27:65).
जेव्हा येशू मेला आणि त्याला पुरण्यात आले, व त्याच्या कबरेवर मोठी धोंड ठेवण्यात आली,
तेव्हा परूशी लोक पिलाताजवळ येऊन ती धोंड मोहरबंद करण्याची व कबरेवर पहारा
देण्याची परवानगी मागू लागले.

त्यांनी आटोकाट प्रयत्न केला – पण व्यर्थच.

त्या वेळी ते आशारहित होते, आजही ते आशारहित आहे, आणि ते नेहमीच आशारहित
असेल. त्यांनी कितीही प्रयत्न केला असला तरीही, लोक येशूला दाबून ठेवू शकत नाहीत. ते
त्याला पुरलेल्या अवस्थेत ठेवू शकत नाहीत.

हे समजणे कठीण नाही: तो मार्ग फोडून बाहेर येऊ शकतो कारण त्याला बळजबरीने आत
टाकण्यात आले नाही. त्याने स्वतःची निंदा होऊ दिली आणि छळ होऊ दिला आणि
बहिष्कृत होऊ दिले आणि तिरस्कार होऊ दिला आणि ठार करू दिले.

”मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच
तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे” (योहान
10:17-18).

कोणी त्याला दाबून ठेवू शकत नाही कारण कोणीही त्याला खाली पाडलेले नाही. जेव्हा तो
तयार होता तेव्हा त्याने स्वतःला दिले.

जेव्हा असे दिसते की तो पुरला गेला ते चांगल्यासाठीच, तेव्हा येशू अंधारात काहीतरी
अद्भुत करीत आहे. “परमेश्वराचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा माणूस जमिनीत बी
टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो, आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे
त्याला कळत नाही.” (मार्क 4:26-27).

जगास वाटते की येशूचा अंत झाला – तो मार्गातून दूर झाला – पण येशू अंधारलेल्या जागी
कार्य करीत आहे. ”गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि
मेला तर पुष्कळ पीक देतो.” (योहान 12:24). त्याने स्वतःला पुरले जाऊ दिले – “कोणीही
(माझा प्राण) माझ्यापासून घेत नाही” – आणि जेव्हा आणि जेथे त्याला वाटेल तेव्हा तो
सामर्थ्यानिशी बाहेर येईल – “तो परत घेण्याचाही अधिकार आहे.”

”त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले; कारण त्याला मरणाच्या स्वाधीन
राहणे अशक्य होते.“ (प्रेषितांची कृत्ये 2:24). ”अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने“ येशूचे
याजकपद अद्याप आहे (इब्री 7:16).

मागील वीस शतके, जगाने खूप प्रयत्न केला आहे – पण व्यर्थ. ते त्याला पुरू शकत नाहीत. ते
त्याला आत धरून ठेवू शकत नाहीत. ते त्याला शांत करू शकत नाहीत किंवा मर्यादित करू
शकत नाहीत. येशू जिवंत आहे आणि जेथे कोठे तो जाऊ इच्छितो तेथे जाण्यास व येण्यास
तो पूर्णपणे स्वतंत्र आहे.

त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्यासोबत जा, मग काहीही का असेना. तुम्ही शेवटी
पराभूत होऊ शकत नाही.

Posted on Leave a comment

11April :थोर राजाचा द्राक्षरस

“कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख
याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.”
(इब्री 4:15).

मी कोणालाही कधीही असे म्हणतांना ऐकलेले नाही, ”माझ्या जीवनाचे खरोखर गंभीर धडे
सुख आणि विश्रांतीच्या समयातून आले आहेत.“ तर मी सुदृढ पवित्र जणांस असे म्हणतांना
ऐकले आहे, ”देवाच्या प्रीतीच्या खोलीचे आकलन करून घेण्यासाठी आणि त्याजबरोबर
खोलवर वाढत जाण्यासाठी मी केलेली प्रत्येक महत्त्वाची वाटचाल दुःखातून आली आहे.”

हे एक गंभीर बायबलसंबंधीत सत्य आहे. उदाहरणार्थ:”इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा
प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी असे समजतो; त्याच्यामुळे
मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा
लाभ प्राप्त व्हावा.” (फिलिप्पै 3:8). अर्थ: वेदना नाही, तर लाभ नाही.

किंवा: आता मला जर त्याद्वारे ख्रिस्ताचा अधिक लाभ होत असेल, तर मग सर्व गोष्टींचा
त्याग केला पाहिजे.

येथे आणखी एक उदाहरण आहे: अर्थ: ”तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो
आज्ञाधारकपणा शिकला;” (इब्री 5:8). याच पुस्तकात असे म्हटलेले आहे की त्याने कधी पाप
केले नाही (इब्री 4:15).

म्हणून आज्ञाधारकपणा शिकण्याचा अर्थ हा नाही की अवज्ञेकडून आज्ञाधारकपणाकडे येतो.
याचा अर्थ आज्ञाधारकपणाच्या अनुभवात देवासोबत अधिक खोलवर वाढत जाणे. याचा
अर्थ देवाप्रत समर्पणाचा अनुभव करणे जो अन्यथा प्राप्त झाला नसता. दुःखातून हेच प्राप्त
होते. वेदना नाही, तर लाभ नाही.

सॅम्युएल रदरफोर्डने म्हटले की जेव्हा त्यांना दुःखाच्या कालकोठीत टाकण्यात आले तेव्हा
त्यांना आठवले की थोर राजा नेहमी तेथे त्याचा द्राक्षरस ठेवत असे. चार्ल्स स्पर्जन यांनी
म्हटले, “दुःखाच्या समुद्रात डुबकी मारणारे दुर्लभ मोती आणतात.”

जेव्हा तुम्हाला काही अनोख्या वेदना होतात ज्यामुळे तुम्हाला असे वाटते की कर्करोग झाला
आहे तेव्हा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीवर अधिक प्रीती करीत नाही का? आम्ही खरोखर
विचित्र प्राणी आहोत. जर आपल्याजवळ आरोग्य आणि शांती आणि प्रेम करण्यास वेळ
असेल तर ती एक पातळ आणि घाईघाईची गोष्ट ठरू शकते. परंतु जर आपण मरणाच्या
लागास असू, तर प्रेम ही एक अव्यक्त आनंदाची खोल, संथ नदी बनते, आणि आपण क्वचितच
तिचा त्याग करणे सहन करू शकतो.

म्हणून, माझ्या बंधूं आणि भगिनींनो, “नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते
तेव्हा तुम्ही आनंदच माना.” (याकोब 1:2).

Posted on Leave a comment

27th Feb: पुनरुत्थानाचे मूलगामी परिणाम

आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा
आपण लाचार आहोत. (1 करिंथ 15:19)

पौल त्याच्या दर तास अनुभवीत असलेल्या संकटावरून, आणि रोजच्या मरणावरून, आणि
वन्यपशूंसोबत त्याच्या लढ्यावरून हा निष्कर्ष काढतो की जर त्याला मरणातून जिवंत
करण्यात आले नाही, तर येशूच्या अनुसरण करण्यात ज्या जीवनाची त्याने निवड केली आहे
ती मूर्खपणाची आणि दयनीय ठरेल.

जर मृत्यू सर्व गोष्टींचा शेवट असता, तर तो म्हणतो, “चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या
मरावयाचे आहे” (1 करिंथ 15:32). याचा अर्थ हा नाही की : जर पुनरुत्थान नसेल तर
आपण सर्व खादाड आणि दारूडे बनू या. दारूडे सुद्धा दयनीय असतात – मग पुनरुत्थान
असो अथवा नसो. त्याच्या म्हणण्याचा अर्थ आहे : जर पुनरुत्थान नाही, तर पृथ्वीवरील
सुखांचा जास्तीत जास्त उपभोग घेण्यासाठी मध्यमवर्गीय संयमाचा काय अर्थ.

पण पौल या गोष्टीची निवड करीत नाही. तो क्लेशाची निवड करतो, कारण तो
आज्ञापालनाची निवड करतो. दमिश्काच्या मार्गावर ख्रिस्तासोबत झालेल्या त्याच्या
भेटीनंतर हनन्या पौलाकडे प्रभू येशूकडून हे शब्द घेऊन आला, “त्याला माझ्या नावासाठी
किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन” (प्रेषितांची कृत्ये 9:16). पौलाने त्याच्या
पाचारणाचा भाग म्हणून या दुःखाचा स्वीकार केला.

पौल हे कसे करू शकला? ह्या मूलभूत आणि दुःखदायक आज्ञापालनाचा उगम काय होता?
याचे उत्तर 1 करिंथ 15:20 मध्ये दिलेले आहे : “तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला
आहेच; तो महानिद्रा घेणार्यांतले प्रथमफळ असा आहे.” दुसऱ्या शब्दांत, ख्रिस्त उठविला
गेला, आणि मी त्याच्यासोबत उठविला जाईन. म्हणून, येशूसाठी सहन केलेले कोणतेही दुःख
व्यर्थ नाही (1 करिंथ 15:58).

पुनरुत्थानाच्या आशेने पौल ज्याप्रकारे जगत होता त्यात मूलभूत बदल घडवून आणला. या
सत्याने त्याला भौतिकतावाद आणि उपभोक्तावादापासून स्वतंत्र केले. या सत्याने त्याला
सुखसोई आणि सुखविलासावाचून जगण्याचे सामर्थ्य दिले ज्याविषयी अनेक लोकांस वाटते
की या जीवनात त्यांस ते प्राप्त झाले पाहिजे. उदाहरणार्थ, जरी त्याला लग्न करण्याचा हक्क
होता (1 करिंथ 9:5), तरीही त्याने त्या सुखाचा त्याग केला कारण त्याला अतिशय दुःख
सहन करावयास पाचारण करण्यात आले होते.

येशूने म्हटले की याच प्रकारे पुनरुत्थानाच्या आशेने आमच्या वर्तनात बदल घडवून आणला
पाहिजे. उदाहरणार्थ, त्याने आम्हास सांगितले की आम्ही अशा लोकांना आपल्या घरी
आमंत्रित करावे जे या जीवनात आमची परतफेड करू शकत नाहीत. हे करण्यासाठी आम्ही
कसे प्रेरित झाले पाहिजे? “नीतिमानाच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल” (लूक
14:14).

पुनरुत्थानाच्या आशेने त्यांस आकार मिळतो की नाही हे पाहण्यासाठी आपल्या सांप्रत
जीवनाकडे निक्षून पाहण्याचे हे एक मूलभूत पाचारण आहे. आपण या जगातील लाभाच्या
आधारे निर्णय घेतो का, किंवा पुढील जीवनाच्या लाभावर? पुनरुत्थान असेल तरच आम्ही
प्रेमाखातर धोका पत्करतो का हे शहाणपणाचे म्हणून समजाविता येऊ शकते?
पुनरुत्थानाचे मूलभूत परिणाम व्हावेत म्हणून आयुष्यभरासाठी आपले पुनर्समर्पण करण्यात
देव आमची मदत करो.
Posted on Leave a comment

26th Feb: जेव्हा देव 100 टक्के आमच्या पक्षाचा बनतो

त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या
देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.
(इफिस 2:3)

देवाचा सर्व क्रोध, सर्व दंडाज्ञा ज्यांस आम्ही पात्र आहोत, त्या सर्व येशूवर ओतण्यात आल्या.
सिद्ध नीतिमत्वासाठी देवाच्या सर्व मागण्या ख्रिस्ताद्वारे पूर्ण करण्यात आल्या. ज्या क्षणी
आपण (कृपेद्वारे!) हा खजिना पाहतो, आणि त्याचा या प्रकारे स्वीकार करतो, त्या क्षणी
त्याचा मृत्यू हा आपला मृत्यू आणि त्याची दंडाज्ञा ही आपली दंडाज्ञा आणि त्याचे नीतिमत्व
हे आपले नीतिमत्व असें गणले जाते आणि त्या क्षणी देव अपरिवर्तनीयपणे 100 टक्के
आपल्या पक्षाचा बनतो.

याने हा प्रश्न अनुत्तरित राहतो की, ”पवित्र शास्त्र हे शिकवीत नाही का की अनंतकाळात
देवाने निवडीमध्ये आमच्यावर आपली कृपा प्रकट केली?“

दुसऱ्या शब्दांत, विचारशील लोक विचारतील, “देव केवळ विश्वास आणि ख्रिस्तासोबत
ऐक्य व नीतिमान ठरविल्या जाण्याच्या क्षणी 100टक्के आपल्या पक्षाचा बनतो का?

जगाच्या स्थापनेच्या आधी निवडीच्या कार्यात तो 100 टक्के आपल्या पक्षाचा बनला नव्हता
का?“ इफिस 1:4-5 मध्ये पौल म्हणतो, “त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व
निर्दोष असावे, म्हणून त्याने (देवानें) जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी
निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे
स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते.”

मग देव अनंतकाळापासूनच 100 टक्के निवडलेल्यांच्या पक्षाचा बनत नाही का? उत्तर “100
टक्के”च्या अर्थावर आधारित आहे.

“100 टक्के” या संज्ञेद्वारे, मी पवित्रशास्त्राच्या कित्येक अनुच्छेदात आढळणारे बायबलचे सत्य
राखून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. उदाहरणार्थ, इफिस 2:3 मध्ये पौल म्हणतो की ख्रिस्ती
विश्वासणारे ख्रिस्त येशूमध्ये जिवंत करण्यापूर्वी “क्रोधाची प्रजा” होते : त्या लोकांत आपणही
सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या
इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.

पौल म्हणतो की, आपल्या नव्या जन्मापूर्वी – म्हणजे आपल्याला ख्रिस्तासोबत जिवंत
करण्यापूर्वी – आपल्यावर देवाचा क्रोध होता. निवडलेले क्रोधाच्या अधीन होते. जेव्हा देवाने
आम्हाला ख्रिस्त येशूठायी जिवंत केले आणि ख्रिस्ताचे सत्य आणि सौंदर्य पाहण्यासाठी
आम्हाला जागृत केले तेव्हा हे बदलून गेले यासाठी की आम्ही त्याला आमच्यासाठी मृत्यू
पावलेला म्हणून आणि ज्याचे नीतिमत्व आमच्या येशूबरोबरच्या ऐक्यामुळे गणले गेले आहे
अशा व्यक्तीच्या रूपात ग्रहण करावे. आमच्यासोबत असे घडण्यापूर्वी आम्ही देवाच्या
क्रोधाच्या अधीन होतो. मग, ख्रिस्तामधील विश्वासामुळे आणि त्याच्याशी एकजुट झाल्या
कारणास्तव, देवाचा सर्व क्रोध दूर झाला आणि त्या अर्थाने, तो 100टक्के आपल्या पक्षाचा
झाला.

म्हणून, या सत्यामध्ये आनंदित व्हा की देव तुमचा सांभाळ करेल. तो तुम्हाला शेवटपर्यंत
टिकवून ठेवील कारण ख्रिस्ताठायी तो तुमच्यासाठी 100 टक्के आहे. आणि म्हणूनच,
शेवटपर्यंत पोहोचणे हे देवाला आपल्यासाठी 100 टक्के बनवत नाही. तो तुमच्यासाठी
आधीच 100 टक्के आहे या तथ्याचा तो परिणाम आहे.

Posted on Leave a comment

25th Feb: तू परमप्रिय आहेस

त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या
देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.
तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने
आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, कृपेने तुमचे
तारण झालेले आहे (इफिस 2:3-5).


गब्रीएल स्वर्गदूताने तुम्हाला असे म्हणतांना आवडणार नाही का की, “तू परमप्रिय आहेस?”
दानीएलासोबत हे तीनदा घडले.

  • “तुझ्या प्रार्थनांना आरंभ होताच आज्ञा झाली, ती तुला सांगण्यास मी आलो आहे; कारण तू परमप्रिय आहेस.” (दानीएल 9:23)
  • “हे दानिएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे; नीट उभा राहा; कारण मला आता तुझ्याकडे पाठवले आहे;” (दानीएल 10:11)
  • तो म्हणाला, “परमप्रिय मानवा, भिऊ नकोस; तुला शांती असो, हिंमत धर, नेट धर.” (दानीएल 10:19)

मी हे कबूल करतो की दरवर्षी जेव्हा मी बायबल वाचतो आणि ही वचने पाहतो, तेव्हा मी ती
घेऊन स्वतःस लागू करू इच्छितो. मला देवाला हे म्हणतांना ऐकावेसे वाटते की, “तू परमप्रिय
आहेस.”

खरे म्हणजे, मी हे ऐकतो. आणि तुम्ही देखील ते ऐकू शकता. जर तुमच्याठायी येशूवर विश्वास
असेल, तर देव स्वतः त्याच्या वचनात तुम्हाला म्हणतो – जे देवाचा दूत म्हणतो त्यापेक्षा अधिक
निश्चित आहे – “तू परमप्रिय आहेस.”


इफिस 2:3-5,8 मध्ये असे लिहिलेले आहे : आम्ही ”इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव
दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील
स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, …कारण कृपेनेच
विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे.”

हेच एकमेव ठिकाण आहे जेथे पौल “अपरंपार प्रेम” या अद्भुत वाक्यांशाचा उपयोग करतो.
आणि ते देवदूताच्या वाणीपेक्षा उत्तम आहे. जर तुम्ही येशूकडे सत्य म्हणून पाहिले आहे आणि
त्याला तुमचा श्रेष्ठ खजिना म्हणून स्वीकारले आहे, अर्थात जर तुम्ही ”जिवंत” असाल, तर तुम्ही
परमप्रिय आहात. विश्वाच्या निर्माणकर्त्याने तुम्हांवर अपरंपार प्रीती केलीं. याचा विचार करा!
परमप्रिय बंधुजन!

Posted on Leave a comment

24th Feb: देव अंतःकरण उघडतो

तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे;
ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंतःकरण प्रभूने असे उघडलें
की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.(प्रेषितांची कृत्ये 16:14)


ज्यां ज्यां ठिकाणी पौलाने सुवार्ता गाजविली तेथे काहींनी विश्वास ठेवला आणि काहींनी नाही.
आम्ही हे कसे समजावे की अपराध आणि पातकांत मृत असलेल्या काही लोकांनी विश्वास ठेवला
आणि काहींनी नाही (इफिस 2:1,5)?


काहींनी विश्वास का ठेवला नाही याचे उत्तर हे आहे की “त्यांनी त्याचा अव्हेर केला” (प्रेषितांची
कृत्ये 13:46) कारण सुवार्तेच्या गोष्टीं त्यांना “मूर्खपणाच्या वाटतात” आणि त्यांना “त्या समजू
शकणार नाहीत” (1 करिंथ 2:14). देहस्वभाव “हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या
नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणि त्याला तसे होता येत नाही” (रोम 8:7).


प्रत्येक जण जो सुवार्ता ऐकतो आणि त्याचा अव्हेर करतो “तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि
आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही” (योहान 3:20). त्यांची “बुद्धी
अंधकारमय झाली आहे… त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न
होऊन” राहते (इफिस 4:18). हे सदोष अज्ञान आहे. सत्य तर प्रकट आहे, पण ते “अनीतिने सत्य
दाबून ठेवतात” (रोम 1:18).


पण मग, जरी सर्व जण अंतःकरणाच्या या बंडखोर कठीणपणाच्या दशेत आहेत, व आपल्या
अपराधांत मेलेले आहेत तरी काही लोक विश्वास का ठेवतात? प्रेषितांच्या कृत्यांचे पुस्तक
कमीत कमी तीन वेगळ्या पद्धतीने याचे उत्तर देते. एक हे आहे की त्यांना विश्वास ठेवण्यासाठी

नेमण्यात आले आहे. जेव्हा पौलाने अंत्युखियातील पिसिदिया येथे सुवार्ता गाजविली, तेव्हा
परराष्ट्रीय आंनदीत झाले आणि “जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी
विश्वास ठेवला” (प्रेषितांचे कृत्ये 13:48).


काही लोक विश्वास का ठेवतात याचे आणखी एक उत्तर असें की देवाने त्यांना पश्चातापबुद्धी
दिली. जेव्हा यरूशलेमातील पवित्र जनांनी हे ऐकले की यहूदीच नव्हे तर परराष्ट्रीयदेखील
सुवार्तेस प्रतिसाद देत होते, तेव्हा ते म्हणाले, “देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून
पश्चातापबुद्धी दिली आहे” (प्रेषितांचे कृत्ये 11:18).


परंतु व्यक्ती सुवार्तेवर विश्वास का ठेवतो या प्रश्नाचे प्रेषितांच्या कृत्यामधील सर्वात स्पष्ट उत्तर हे
आहे की देव अंतःकरण उघडतो. लुदिया याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. तिने का विश्वास
ठेवला? प्रेषितांची कृत्ये 16:14 म्हणते, “तिचे अंतःकरण प्रभूने असे उघडलें की पौलाच्या
सांगण्याकडे तिने लक्ष दिले.”

जर तुम्ही येशूवर विश्वासणारे असाल, तर या सर्व गोष्टी तुमच्यासोबत घडल्या आहेत : तुम्हाला
विश्वास ठेवण्यासाठी नेमण्यात आले होते; तुम्हाला पश्चातापबुद्धी देण्यात आली होती; आणि
देवाने तुमचे अंतःकरण उघडले होते. तुमचे उर्वरित जीवन तुम्ही विश्वासणारे आहात या
चमत्काराप्रत अद्भुत कृतज्ञतेने ओतप्रोत असले पाहिजे.

Posted on Leave a comment

23rd Feb: असामान्य धमकीची घटका

ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात; कारण गौरवाचा आत्मा
म्हणजे ‘देवाचा आत्मा’ तुमच्यावर येऊन ‘राहिला आहे.’ त्यांच्याकडून त्याची निंदा होते, पण
तुमच्याकडून तो गौरविला जातो. (1 पेत्र 4:14)


आज जगातील अनेक ख्रिस्ती लोकांस ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे येणाऱ्या जीवघेण्या
धोक्याची जाणीव नाही. आम्हाला छळमुक्त जीवन जगण्याची सवय झालेली आहे. असे वाटते
की सर्वकाही असेच असले पाहिजे.


म्हणून, परिस्थिती यापेक्षा वेगळी असू शकते या धोक्याला आमची पहिली प्रतिक्रिया बहुधा
संतापाची असते. पण तो संताप या गोष्टीचे चिन्ह असू शकतो की आम्ही प्रवासी व परदेशवासी
आहोत ही जाणीवच आम्ही गमावून बसलो आहोत (“प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व
परदेशवासी’ आहात…” 1 पेत्र 2:11).

कदाचित आम्ही या जगात फारच मुळावलेले आहोत. आम्हाला ख्रिस्तासाठी स्वर्गीय घराची
आठवण येत नाही जशी पौलाला येत असे : “आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू
ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत” (फिलिप्पै 3:20).


आमच्यापैकी अनेकांस आठवण करून देण्याची गरज आहे, “प्रियजनहो, तुमची पारख
होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुमच्यावर आली आहे तिच्यामुळे आपणांस काही अपूर्व झाले असे
वाटून त्याचे नवल मानू नका.” (1 पेत्र 4:12). हे विचित्र नाही.


तुम्ही कधी विचार केला आहे की शेवटच्या परीक्षेच्या घटकेत तुमचे काय होईल? बंदूकधार्याने
तुमच्यावर नजर ठेवली आहे आणि तो तुम्हाला विचारतो, ”तू ख्रिस्ती आहेस का?“ तुम्हाला ही
आशा देण्यासाठी एक कठोर शब्द आहे की तुम्ही विचार करता त्यापेक्षा उत्तम करू शकता.


पेत्र म्हणतो, “ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात; कारण
गौरवाचा आत्मा म्हणजे ‘देवाचा आत्मा’ तुमच्यावर येऊन ‘राहिला आहे.’ त्यांच्याकडून त्याची
निंदा होते, पण तुमच्याकडून तो गौरविला जातो” (1 पेत्र 4:14). पेत्राकडून हे प्रोत्साहन म्हणते
की असामान्य धमकीच्या घटकेत (अपमान असो व मृत्यू) “गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा

आत्मा आमच्यावर येऊन राहतो.” याचा अर्थ हा नाही का की आपण ख्रिस्ती असल्यामुळे जे
संकटसमयी दुःख सोसतांत देव त्यांना विशेष मदत पुरवितो?


माझ्या म्हणण्याचा अर्थ हा नाही की तो आमच्या इतर क्लेशांत तो गैरहजर राहतो. माझ्या
म्हणण्याचा अर्थ केवळ हा आहे की पेत्र कल्पनेपलीकडे जाऊन असें म्हणतो की जे “ख्रिस्ताच्या
नावामुळे” दुःख सोसतात त्यांना आपणांवर “गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा” “येऊन
राहण्याचा” विशेष अनुभव येईल.

प्रार्थना करा की जेव्हा परीक्षा येतात तेव्हा तुम्हीं देखील हेंच अनुभवाने जाणून घ्यावें. त्या क्षणी
धैर्याची साधनसामुग्री असेल जी इतर प्रसंगी आमच्याजवळ नसते. धैर्य धरा.