“जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत
बाहेर पडतो तो खातरीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.” (स्तोत्र 126:5-6).
बी पेरण्याविषयी दुःखद काहीही नाही. त्यासाठी कापणीपेक्षा जास्त श्रम लागत नाही.
दिवस सुंदर असू शकतात. कापणीसाठी मोठी आशा असू शकते.
तरीही स्तोत्र “अश्रूपूर्ण नेत्रांनी” पेरणी करण्याविषयी सांगते. ते म्हणते की कोणीतरी
“पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो.” तर, ते का रडत आहेत?
मला वाटते की त्याचे कारण हे नाही की पेरणी करणे दुःखाचे आहे किंवा पेरणी कठीण आहे.
मला असे वाटते की रडण्याचा संबंध पेरणीशी मुळीच नाही. पेरणी हे फक्त काम आहे जे
आपल्याला तेव्हांही केले पाहिजे जेव्हां आमच्या जीवनात रडवणाऱ्या गोष्टी असतांत.
आमचे दुःख करणे समाप्त होईपर्यंत किंवा आमच्या सर्व समस्यांचे निवारण केलें जाईपर्यंत
पिके थांबणार नाहीत. जर आम्हाला पुढच्या हिवाळ्यात खायचे असेल, तर आम्हाला शेतात
जावे लागेल आणि बी पेरावे लागेल, आम्ही रडत असू वा नसू.
जर तुम्ही असे करता, तर स्तोत्राचे अभिवचन हे आहे की तुम्ही “हर्षाने कापणी कराल.”
तुम्ही “आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन” घरी याल. यासाठी नाही की पेरणीच्या
आसवांमुळे कापणीचा आनंद उत्पन्न होतो, तर निव्वळ पेरणीमुळे कापणी होते, आणि जरी
तुमचे अश्रू तुम्हाला पेरणी सोडून देण्यास मोहात पाडत असले, तरीही तुम्हाला हे लक्षात
ठेवण्याची गरज आहे.
तर, धडा हा आहेः जेव्हा साधी, सरळ कामे करावयाची असतात, आणि तुमचे अंतःकरण
दुःखाने भरलेले असेल, आणि तुमची आसवे सहज वाहत असतील, तेव्हा पुढे जा आणि
अश्रूंसोबतच कामे करा. वास्तववादी बना. आपल्या अश्रूंना म्हणा, “अश्रूंनो, मला तुमची
जाणीव आहे. तुम्ही माझ्यात जीवनाचा त्याग करण्याची इच्छा उत्पन्न करता. पण शेतात
पेरणी करावयाची आहे (भांडी धुवायची, गाडी दुरूस्त करावयाची, उपदेश लिहावयाचा
आहे).”
मग, देवाच्या वचनाच्या आधारे म्हणा, “अश्रूंनो, मला माहित आहे की तुम्ही सदाकाळ
टिकणार नाही. मी माझे काम (अश्रू आणि सर्व) करतो फक्त ही वस्तुस्थिती शेवटी
आशीर्वादाची कापणी आणील. म्हणून, पुढे जा आणि जरूरी असेल तर वाहत रहा. पण
माझा विश्वास आहे – जरी मला ते अद्याप दिसत नसले किंवा ते पूर्णपणे जाणवत नसले –
तरी माझा विश्वास आहे की माझ्या पेरणीचे साधे काम कापणीच्या पेढ्या घेऊन येईल.
आणि माझे अश्रू आनंदात बदलतील.”