आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही.ती
रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे. (विलापगीत 3:22-23).
परमेश्वराची करुणा रोज सकाळी नवी होते कारण दररोज त्या दिवसासाठी पुरेशी करुणा
मुबलक प्रमाणांत उपलब्ध असते. देव प्रत्येक दिवसाचे दुःख ठरवितो. तसेंच देव प्रत्येक
दिवसासाठी करुणा देखील ठरवितो. त्याच्या मुलांच्या जीवनात, दु:ख व करुणा परिपूर्णपणे
ठरविण्यात आलेलें आहेंत. येशूने म्हटले, ”ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची
चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.“ (मत्तय 6:34). ज्या दिवसाचे दुःख त्या
दिवसाला पुरे. प्रत्येक दिवशी त्याची दया किंवा करुणा ठरविली आहे. प्रत्येक दिवस दर सकाळी
नवा होतो.
परंतु जेव्हा आपल्याला वाटते की आजच्या साधनसामुग्रीवर उद्याचा भार आपल्याला सहन
करावा लागू शकतो तेव्हा आपण कित्येकदा निराश होतो. देवाला वाटते की आपण हे जाणावे
की असे होणार नाही. आजची करुणा आजच्या दुःखांसाठी आहे. उद्याची करुणा ही उद्याच्या
दुःखांसाठी असणार आहे.
कधीकधी आपण विचार करतो की भयंकर परीक्षेत स्थिर उभे राहण्यासाठी आम्हांवर करुणा
केलीं जाईल कीं नाहीं. होय, केलीं जाईल. पेत्र म्हणतो, ”ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत
असल्यास तुम्ही धन्य आहात; कारण गौरवाचा आत्मा म्हणजे ‘देवाचा आत्मा’ तुमच्यावर येऊन
‘राहिला आहे.’ त्यांच्याकडून त्याची निंदा होते, पण तुमच्याकडून तो गौरविला जातो“ (1 पेत्र
4:14). जेव्हा निंदा होते, तेव्हा गौरवाचा आत्मा येतो. स्तेफनाला दगडमार होत असतांना असे घडले.
तुमच्यासाठी देखील असेंच घडेल. जेव्हा आत्म्याची आणि गौरवाची गरज भासेल, तेव्हा
ते येतील.
रानात मान्ना एका दिवसाला एकदाच दिला जात असे. साठवणूक करायची नव्हती. देवाच्या
दयेवर आपण अशाच प्रकारे अवलंबून राहिले पाहिजे. उद्याची ओझी उचलण्याचे बळ तुम्हाला
आज प्राप्त होणार नाही. आजच्या दुःखांसाठी तुम्हाला करुणा देण्यात आली आहे.
उद्या करुणा नवी होईल. ”ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला
बोलावले तो देव विश्वसनीय आहे.“ (1 करिंथ 1:9).