ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात; कारण गौरवाचा आत्मा
म्हणजे ‘देवाचा आत्मा’ तुमच्यावर येऊन ‘राहिला आहे.’ त्यांच्याकडून त्याची निंदा होते, पण
तुमच्याकडून तो गौरविला जातो. (1 पेत्र 4:14)
आज जगातील अनेक ख्रिस्ती लोकांस ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे येणाऱ्या जीवघेण्या
धोक्याची जाणीव नाही. आम्हाला छळमुक्त जीवन जगण्याची सवय झालेली आहे. असे वाटते
की सर्वकाही असेच असले पाहिजे.
म्हणून, परिस्थिती यापेक्षा वेगळी असू शकते या धोक्याला आमची पहिली प्रतिक्रिया बहुधा
संतापाची असते. पण तो संताप या गोष्टीचे चिन्ह असू शकतो की आम्ही प्रवासी व परदेशवासी
आहोत ही जाणीवच आम्ही गमावून बसलो आहोत (“प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व
परदेशवासी’ आहात…” 1 पेत्र 2:11).
कदाचित आम्ही या जगात फारच मुळावलेले आहोत. आम्हाला ख्रिस्तासाठी स्वर्गीय घराची
आठवण येत नाही जशी पौलाला येत असे : “आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू
ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत” (फिलिप्पै 3:20).
आमच्यापैकी अनेकांस आठवण करून देण्याची गरज आहे, “प्रियजनहो, तुमची पारख
होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुमच्यावर आली आहे तिच्यामुळे आपणांस काही अपूर्व झाले असे
वाटून त्याचे नवल मानू नका.” (1 पेत्र 4:12). हे विचित्र नाही.
तुम्ही कधी विचार केला आहे की शेवटच्या परीक्षेच्या घटकेत तुमचे काय होईल? बंदूकधार्याने
तुमच्यावर नजर ठेवली आहे आणि तो तुम्हाला विचारतो, ”तू ख्रिस्ती आहेस का?“ तुम्हाला ही
आशा देण्यासाठी एक कठोर शब्द आहे की तुम्ही विचार करता त्यापेक्षा उत्तम करू शकता.
पेत्र म्हणतो, “ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात; कारण
गौरवाचा आत्मा म्हणजे ‘देवाचा आत्मा’ तुमच्यावर येऊन ‘राहिला आहे.’ त्यांच्याकडून त्याची
निंदा होते, पण तुमच्याकडून तो गौरविला जातो” (1 पेत्र 4:14). पेत्राकडून हे प्रोत्साहन म्हणते
की असामान्य धमकीच्या घटकेत (अपमान असो व मृत्यू) “गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा
आत्मा आमच्यावर येऊन राहतो.” याचा अर्थ हा नाही का की आपण ख्रिस्ती असल्यामुळे जे
संकटसमयी दुःख सोसतांत देव त्यांना विशेष मदत पुरवितो?
माझ्या म्हणण्याचा अर्थ हा नाही की तो आमच्या इतर क्लेशांत तो गैरहजर राहतो. माझ्या
म्हणण्याचा अर्थ केवळ हा आहे की पेत्र कल्पनेपलीकडे जाऊन असें म्हणतो की जे “ख्रिस्ताच्या
नावामुळे” दुःख सोसतात त्यांना आपणांवर “गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा” “येऊन
राहण्याचा” विशेष अनुभव येईल.
प्रार्थना करा की जेव्हा परीक्षा येतात तेव्हा तुम्हीं देखील हेंच अनुभवाने जाणून घ्यावें. त्या क्षणी
धैर्याची साधनसामुग्री असेल जी इतर प्रसंगी आमच्याजवळ नसते. धैर्य धरा.