Description
मंडळीसाठी देवाचा विशेष असा उद्देश्य आहे। मंडळी, दृश्य स्वरुपातील दिसणारे एक साधन आहे ज्याद्वारे देवाचे महान गौरव होते। आणि अशा मंडळीमध्ये देवाची स्तुती, प्रशंसा करणारी स्तोत्रे गायली जातात। खेदाने सांगावे लागते कीं, ख्रिस्ती समजाध्ये अनेकजण ह्या ढोंगीपणाच्या सापळयामध्ये सापडले आहेत, जे देवाचे गौरव स्वत:साठी चोरण्याचे प्रयत्न करीत असतात आणि या चोराच्या बदल्यामध्ये स्वत:ला आणि मंडळयांना देवापासून प्राप्त होणारा आनंद आणि आशीर्वाद गमावुन बसतात। ह्या पुस्तकामध्ये अभ्यासासाठी घेण्यात आलेली संदेशाची मालिका मत्तयकृत शुभवर्मानाच्या 23 व्या अध्यायामधून घेण्यात आली आहे। जरी येशु ख्रिस्ताने त्याच्या दिवसांमध्ये केवळ परुश्यांच्यासाठीच स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता, तरी अगदी आजही त्याचे लागूकरण आमच्याशी संबंधीत आहे व तो वचने त्या परुश्यांच्या बोचक वर्तणूकीची आम्हांला आठवण करुण देतात। जी आजही येशू ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये सातत्याचने दिसून येते।
“ढोंगी? आणि आम्ही?” सर्व विश्वासणान्यांना पुन्हा एकवार आत्मपरीक्षणाद्वारे आपल्या अंत:करणात आणि स्वत:ला शुद्ध करण्यासाठी “वचनरुपी जलस्नान” अशी अपूर्व संधी आहे। फक्त आणि फक्त देवाच्या गौरवासाठी।
Reviews
There are no reviews yet.