Description
एक आदर्श मंडळी म्हणजे काय, आणि तुम्ही ती कशी ओळखाल?
एक आदर्श मंडळी म्हणजे काय, आणि तुम्ही ती कशी ओळखाल? सुदृढ मंडळ्या घडवणे हे पुस्तक तुम्हाला एका सुदृढ मंडळीची प्रमुख वैशिष्ट्ये—जसे की, विवेचनात्मक प्रवचने, पवित्र शास्त्राधारित ईश्वरी परिज्ञान आणि सुवार्तेची योग्य समज—ओळखण्यास सहाय्य करेल. तसेच, हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मंडळीत अशी वैशिष्ट्ये विकसित करण्यासाठी प्रोत्साहित देखील करेल.
नव्या करारातील लेखकांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आणि मंडळीतील सर्व सभासदांना—मग ते पाळक असोत किंवा सर्वसामान्य विश्वासणारे—संबोधित करताना, मार्क डेवर सर्व विश्वासणाऱ्यांना आपल्या स्थानिक मंडळीला जिवंत व सुदृढ ठेवण्यात त्यांची भूमिका बजावण्याचे आव्हान देतात. ‘सुदृढ मंडळी म्हणजे काय?’ हे पुस्तक, जे ख्रिस्ताचे शरीर आहे त्या मंडळीत, देवाने आपल्याला दिलेली भूमिका पूर्ण करण्यासाठी कालातीत सत्ये आणि व्यवहारिक तत्त्वे प्रदान करते.
देवाने आपल्या कृपेतून आता मराठी भाषेत हे उत्तम व योग्य वेळी आलेले पुस्तक उपलब्ध करून दिले आहे, जेणेकरून मंडळ्यांनी स्वतःची नीट तपासणी करावी, जिथे सुधारणा आवश्यक आहे तिथे सुधारणा व्हावी, आणि पुन्हा एकदा खऱ्या पवित्रशास्त्रनिष्ठ मार्गावर परत यावे.
पा. विनीत ससाणे – M.Div., जिवंत आशा बायबल चर्च, पुणे
“मार्क डेवर यांनी आधुनिक मंडळ्यांना देवाच्या वचनाचा आरसा दाखवला आहे. आज अनेक जण मंडळीचे यश आकार, पद्धत किंवा कार्यक्रमांवरून मोजतात. या काळात, ‘एक सुदृढ मंडळी म्हणजे काय?’ हे पुस्तक आपल्याला पुन्हा पवित्र शास्त्राकडे वळवते.”
पा. मंगेश रायाराम पुणे रिफॉर्म्ड बॅपटिस्ट चर्च; अध्यक्ष, सोव्हरिन ग्रेस थिऑलॉजिकल इन्स्टिट्यूट
“आजच्या जगात, जेव्हा भांडुपणा, उपभोक्तावाद आणि तत्त्वांशी होणारी तडजोड यांमुळे ख्रिस्ताच्या खऱ्या मंडळीचे सत्त्व लोप पावत आहे, अशा परिस्थितीत ‘एक सुदृढ मंडळी म्हणजे काय?’ हे पुस्तक आपल्याला एका सुदृढ मंडळीचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी पुन्हा पवित्र शास्त्राकडे वळवते.”
पा. नॅथन इडा, कॅल्व्हरी बॅपटिस्ट बायबल कॉलेज आणि सेमिनरी, नवी मुंबई
मार्क डेवर (पीएचडी, केंब्रिज विद्यापीठ) हे वॉशिंग्टन, डी.सी. येथील कॅपिटल हिल बॅपटिस्ट मंडळीचे वरिष्ठ पाळक आणि 9Marks (9Marks.org) चे अध्यक्ष आहेत. डेवर यांनी डझनाहून अधिक पुस्तके लिहिली आहेत आणि ते देशभरातील परिषदांमध्ये प्रवचने देतात. ते त्यांची पत्नी, कॉनी, यांच्यासोबत वॉशिंग्टन, डी.सी. येथे राहतात आणि त्यांना दोन प्रौढ मुले आहेत.
हा खंड 9Marks च्या ‘सुदृढ मंडळ्या घडवणे’ या मालिकेचा भाग आहे.









Reviews
There are no reviews yet.