Description
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीकरता पोषक आध्यात्मिक आहार असणे गरजेचे आहे. तारणान्ंतरचे संपूर्ण जीवन हे निरे दुध व जडान्नावर निर्भर असणे. जड अन्न पचण्यापूर्वी निरे दुध गरजेचे असते. आधी मुलभूत ख्रिस्ती सत्य पचविण्याची गरज आहे.
फक्त 107 प्रश्नोत्तरांद्वारा दिलेले शिक्षण ख्रिस्ती विश्वासाचे मूलभूत पैलू सादर करतात. पहिल्या प्रश्नाच्या उत्तराद्वारे मानवाच्या जीवनाचा मुख्य उद्देश काय? हे सत्य सादर करण्यात आले आहे. आम्ही देव, पवित्र शास्त्र, त्रैक्य, निर्मिती, र्इश्वरी योजना, पाप, ख्रिस्त व सुवार्तेबद्दल काय विश्वास ठेवावा हे प्रश्न 2-38 शिकवतात. प्रश्न 39-107 हे शिकवतात की देव मानवाकडून कशाची मागणी करतो, आज्ञाधारकपण, विश्वास, पश्चाताप, कॄपेची साधने आणि प्राथनेची प्राधान्ये यांविषयी काय विश्वास ठेवावा. थोडक्यात वेस्टमिन्स्टर लघु प्रश्नोत्तरे देवाचे गौरव, पवित्र शास्त्राचा अधिकार, ख्रिस्ताचे पूर्ण कार्य, तारण कॄपेने विश्वासाच्या योगे अशा पायाभूत तत्वांवर भर देणारे सुशिक्षण आहे.
Reviews
There are no reviews yet.