Posted on

03 Feb: सर्वात मोठी प्रीति

मुलांनो, मी तुम्हांस लिहितो, कारण त्याच्या नावामुळें तुमच्या पापांची तुम्हांस क्षमा झाली आहे. (1 योहान 2:12)

देव “त्याच्या नावामुळें” म्हणजे त्याच्या स्वतःच्या गौरवासाठीं आम्हांवर प्रेम करतो, आम्हांला क्षमा करतो आणि तारतो यावर भर देणे का महत्वाचे आहे? त्याची कारणे आहेत, त्यांपैकी दोन येथें सांगितले आहेंत.

1) आपण यावर भर देणे कीं देव त्याच्या स्वतःच्या गौरवासाठीं प्रीति करतो आणि क्षमा करतो यामुळें महत्वाचे आहे कारण बायबल यावर भर देते.

मी आपल्याकरितां तुझे अपराध पुसून टाकितो; मीच तो, तुझी पातकें स्मरत नाहीं (यशया 43:25)

हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठीं माझ्या दुष्टाईची क्षमा कर; कारण ती फार झाली आहे. (स्तोत्र 25:11)

हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या महिम्यासाठीं आम्हांला साहाय्य कर; आपल्या नावासाठीं आम्हांला सोडव व आमची पातके धुऊन टाक! (स्तोत्र 79:9)

हे परमेश्वरा, आमचे अपराध जरी आमच्याविरुद्ध साक्ष देतात तरी तू आपल्या नामास्तव कार्य कर. (यिर्मया 14:7)

हे परमेश्वरा, आमची दुष्टता, आमच्या पूर्वजांचे दुष्कर्म, आम्ही जाणतो; आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे. तू आपल्या नामास्तव आमचा वीट मानू नकोस; तुझ्या वैभवाच्या गादीची अप्रतिष्ठा करू नकोस. (यिर्मया 14:20-21)

त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवाने त्याला [ख्रिस्ताला] पुढे ठेवले. ह्यासाठीं कीं, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे; म्हणजे आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे कीं, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणार्‍याला नीतिमान ठरवणारे असावे. (रोमकरांस 3:25-26)

त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झाली आहे. (1 योहान 2:12)

2) आपण यावर भर देणे कीं देव त्याच्या स्वतःच्या गौरवासाठीं प्रीति करतो आणि क्षमा करतो यामुळें महत्वाचे आहे कारण त्यामुळें हे स्पष्ट होते कीं देव आपल्यावर मोठे प्रेम करतो.

हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे कीं, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे; ह्यासाठीं कीं, जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पाहावा. (योहान 17:24)

देवाची आपल्यावरील प्रीति अशी प्रीति नाहीं कीं जी आपल्याला मोठे बनविते, तर ती अशी प्रीति आहे ज्याद्वारें तो स्वतःचा मोठेपणा दाखवून देतो. स्वर्ग हा आरशांचा प्रेक्षागृह नसून त्याच्या अविनाशी महानतेचा असा दृष्टीक्षेप असेल जिला तुम्हीं जितके अधिक दूरवर पाहाल तितकी दूरवर दिसून येईल. आपण अद्वितीय किंवा मोठे आहों या भावनेनें स्वर्गात जाणें निव्वळ फजिती ठरेल.

सर्वात मोठी प्रीति ह्या गोष्टीची खात्री करून घेते कीं देवच सर्व कांही अशा प्रकारे करतो कीं ज्यामुळें केवळ त्याच्या स्वतःच्या प्रभुत्वाचे सामर्थ्य व गौरवाची स्तुति होते, ह्यासाठीं कीं जेव्हां आपण स्वर्गात जाऊं तेव्हां आपला आनंद बहुगुणीत करणारी एक गोष्ट तेथें असेल: देवाचा गौरव. देवानें आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरिता समर्पण केलें ही त्याची सर्वांत मोठी प्रीति होय (रोमकरांस 8:32). जेव्हां तो म्हणतो कीं तो आपल्यावर प्रीति करितो व आपल्या नावासाठीं आमच्या अपराधांची क्षमा करितो तेव्हां त्याला हेंच म्हणायचे आहे.

Leave a Reply